*आंतरराष्ट्रीय माहितीचा अधिकार दिन साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आंतरराष्ट्रीय माहितीचा अधिकार दिन साजरा*
*आंतरराष्ट्रीय माहितीचा अधिकार दिन साजरा*
तळोदा(प्रतिनिधी):-28 सप्टेंबर 2026 माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे आंतरराष्ट्रीय माहितीचा अधिकार दिनानिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक उमेश पाटील होते तर प्रमुख वक्ते राजेंद्र ढोडरे होते. माहितीचा अधिकार दिनाबद्दल सांगत असताना राजेंद्र ढोडरे यांनी सांगीतले की, जागतिक संघटना युनोस्कोने 15 नोव्हेंबर 2015 रोजी घोषीत केले की, 28 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा.
त्यानंतर युनो या जागतिक संघटने
सुद्धा 2019 मध्ये 28 सप्टेंबर या दिनाला अधिकृत मान्यता दिली.
तेव्हापासून हा आंतरराष्ट्रीय माहितीचा अधिकार दिन साजरा केला जातो. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष उमेश पाटील यांनी सांगीतले की, जागतिक माहिती अधिकार दिन जगात साजरा होण्याआधी याची मुहूर्तमेढ भारतात रोवली गेली असल्याचे सांगितले. भारतात माहिती अधिकार कायदा 15 जून 2005 रोजी संसदेत मांडण्यात आला. त्यानंतर हा कायदा 12 ऑक्टोबर 2005 पासून संपूर्ण भारतात लागू करण्यात आला. हा कायदा सरकारी कामात पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिकांना माहिती मिळवून देण्यासाठी मदत करतो. असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास मगरे यांनी केले तर आभार संदीप मोरे यांनी मानले. तसेच
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी
तुकाराम भील, विलास पाडवी, सुदाम जांभोरे, राहुल साळुंखे, पंकज खेडकर, संतोष राठोड, मोहन वळवी आणि सुबोध जावरे यांनी परिश्रम घेतले.



