*एकलव्य विद्यालयात माहिती अधिकार दिन साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*एकलव्य विद्यालयात माहिती अधिकार दिन साजरा*
*एकलव्य विद्यालयात माहिती अधिकार दिन साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभाग निर्णयान्वये आज एकलव्य विद्यालयात माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माहिती अधिकार कायद्याचे महत्व व उपयोगिता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावी हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अजित लांडगे यांनी आपल्या भाषणात माहिती अधिकार कायदा कधी व कसा अस्तित्वात आला याची माहिती विद्यार्थ्यांना देत, माहिती अधिकार कायद्याची वैशिष्ट्ये आणि महत्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. माहिती अधिकाराचा वापर करून आपण आपली महत्वाची कामे कशी करू शकतो हे त्यांनी उदाहरणासह स्पष्ट केले. ह्या कायद्याचा वापर योग्य कार्यासाठी करावा असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारले तथा अजित लांडगे यांनी विद्यार्थ्यांचे शंका निरसन केले.
व्यासपीठावर विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे, उपमुख्याध्यापक डॉ गिरीश पवार, पर्यवेक्षक टिका पाडवी समन्वयक जयदीप नटावदकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल भावसार यांनी केले तर आभार अन्सार शेख यांनी मानले.



