*नाशिक विभागातील 192 ठिकाणी आज, पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ, सहसंचालक अनिल गावित यांची माहिती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नाशिक विभागातील 192 ठिकाणी आज, पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ, सहसंचालक अनिल गावित यांची माहिती*
*नाशिक विभागातील 192 ठिकाणी आज, पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ, सहसंचालक अनिल गावित यांची माहिती*
नाशिक(प्रतिनिधी):-सुशिक्षित बेरोजगार युवक- युवती तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक विभागातील 192 ठिकाणी मंगळवार 29 सप्टेंबर 2026 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक अनिल गावित यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये दिली आहे. रोजगार महाकुंभमध्ये विविध नामांकित औद्योगिक आस्थापना, कंपन्या, उद्योजक सहभागी होतील. त्यांच्या आवश्यकतेनुसार विविध पदांसाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या महाकुंभमध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कौशल्य प्रशिक्षण, तसेच शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना त्यांच्या पात्रता व कौशल्यानुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. उमेदवारांना संबंधित आस्थापनांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधून पदांची माहिती घेता येणार आहे. तेथेच मुलाखत व निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
युवकांनी रोजगाराच्या या संधीचा लाभ घेण्यासाठी आवश्यक शैक्षणिक व प्रशिक्षण प्रमाणपत्रे, आधारकार्ड, बायोडाटा, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र तसेच अन्य आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
विभागातील जास्तीत जास्त युवक- युवतींनी या रोजगार महाकुंभमध्ये सहभागी होऊन उपलब्ध रोजगाराच्या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहसंचालक गावित यांनी केले आहे.



