*जिल्ह्यात विशेष सखोल प्रक्रियेला वेग, नोटीस मिळालेल्या मतदारांच्या घरी जाऊन BLO कागदपत्रे स्वीकारणार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्ह्यात विशेष सखोल प्रक्रियेला वेग, नोटीस मिळालेल्या मतदारांच्या घरी जाऊन BLO कागदपत्रे स्वीकारणार*
*जिल्ह्यात विशेष सखोल प्रक्रियेला वेग, नोटीस मिळालेल्या मतदारांच्या घरी जाऊन BLO कागदपत्रे स्वीकारणार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील मतदारांना ‘मॅप न केलेले ’ किंवा ‘तार्किक विसंगती ’ संदर्भात नोटीस बजावण्यात आलेल्या मतदारांच्या घरी जाऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) आवश्यक कागदपत्रे स्वीकारणार आहेत. अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या 26 सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत विशेष सखोल पुनरीक्षण कायक्रमांच्या अनुषंगाने अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यानुसार विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ‘मॅप न केलेले ’ किंवा ‘तार्किक विसंगती संदर्भात ज्या मतदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. अशा नोटीसधारक मतदारांच्या घरी संबंधित केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी भेट देवून आवश्यक कागदपत्रे व माहिती संकलीत करणार आहे. संकलीत करण्यात आलेली कागदपत्रे व माहिती संबंधित केंद्रस्तरीय अधिकारी यांनी ECINET प्रणालीवर अपलोड करुन संबंधित मतदार नोंदणी अधिकारी ( ERO) यांचेकडे सादर करतील. अशा नोटीसधारक मतदारांना सर्वसाधारणपण मतदार नोंदणी अधिकारी (ERO) आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) कार्यालयात प्रत्यक्ष सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची आवश्यकता असणार नाही. तथापि, प्रकरणाच्या स्वरुपानुसार मतदार नोंदणी अधिकारी (ERO) यांना आवश्यक वाटल्यास अपवादात्मक परिस्थितीत सुनावणी घेता येईल. शक्तयो अशी सुनावणी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात यावी. आवश्यक असल्यास संबंध्णित मतदाराच्यावतीने कुटूंबातील कोणतीही प्रौढ सदस्य अधिकृतपणे सुनावणीस उपस्थित राहू शकतो. जिल्ह्यातील रात्रीच्या निवाऱ्यात राहणारे नागरिक, मजूर, बेघर तसेच गरजू नागरिकांसाठी Help Desk आणि विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या माध्यमातून संबंधित नागरिकांना मतदार नोंदणी व पुनरीक्षण प्रक्रियेत आवश्यक मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. विशेष सखोल पुनरिक्षणादरम्यान पात्र असूनही मतदार यादीत नाव समाविष्ट राहिले नसल्यास तसेच युवा व प्रथमच मतदान करणारे पात्र मतदारांना मतदारायादीत नाव समाविष्ट करण्यासाठी संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे अर्ज करता येणार आहे. यासाठी निवडणूक यंत्रणेमार्फत विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र राज्यासाठी दावे व हरकती दाखल करण्याची मुदत 12 ऑक्टोबर, 2026 पर्यंत वाढविली आहे. तसेच नोटिसा तसेच दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत 10 नोव्हेंबर, 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीमध्ये आपले नाव तपासावे, नावाबाबत काही त्रुटी असल्यास किंवा पात्र व्यक्तींचे नाव मतदार यादीत समाविष्ट करावयाचे असल्यास या प्रक्रियेत सहभागी व्हावे, तसेच विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी केंद्रस्तरीय अधिकारी, मतदान नोंदणी अधिकारी व निवडणूक यंत्रणेस सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.



