*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत ‘आविष्कार 2026’ पोस्टर सादरीकरण स्पर्धा उत्साहात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत ‘आविष्कार 2026’ पोस्टर सादरीकरण स्पर्धा उत्साहात*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत ‘आविष्कार 2026’ पोस्टर सादरीकरण स्पर्धा उत्साहात*
नंदुरबार(प्रतिनिधी):-बामडोद येथील शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता, संशोधनवृत्ती आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘आविष्कार कॉम्पिटिशन 2026’ अंतर्गत संस्थास्तरीय पोस्टर सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम 24 सप्टेंबर 2026 रोजी SIPN सेमिनार हॉलमध्ये उत्साहात पार पडला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. अमरदीप अरुणकुमार महाजन, जी. एच. महाजन न्यू हायस्कूल व एस. एल. माळी ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, तळोदा, जि. नंदुरबार हे होते. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना संशोधन, नवोपक्रम आणि नावीन्यपूर्ण विचारांचे महत्त्व पटवून देत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आरोग्य, औषध निर्माणशास्त्र व समाजोपयोगी नवकल्पनांवर आधारित विविध पोस्टर्स प्रभावीपणे सादर केली. प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे आणि त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पनांचे उपस्थित मान्यवरांनी व संस्थेचे सचिव गणेश गोविंद पाटील व अध्यक्षा योगिता गणेश पाटील यांनी कौतुक केले.



