*नंदुरबार जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर-आ.चंद्रकांत रघुवंशींच्या प्रयत्नांना यश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर-आ.चंद्रकांत रघुवंशींच्या प्रयत्नांना यश*
*नंदुरबार जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर-आ.चंद्रकांत रघुवंशींच्या प्रयत्नांना यश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्यातील 358 तालुक्यांपैकी 265 तालुक्यांमध्ये प्रथम कळ म्हणजेच Trigger 1 लागू करण्यात आली असून, जिल्ह्यातील नवापूर, नंदुरबार, अक्कलकुवा, शहादा, तळोदा व अक्राणी या सहा तालुक्यांच्या समावेश करण्यात आलेला आहे. याबाबत शिवसेनेचे नेते, आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी पाठपुरावा केला होता. जिल्ह्यातील सहाही तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भाग म्हणून समावेश करण्यात आला असल्याने संबंधित तालुक्यांसाठी विविध सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात येणार आहेत. प्रथम कळ म्हणजेच Trigger 1 लागू करण्यात आल्यामुळे दुष्काळाची दाहकता अनुभवत शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिवसेनेचे नेते, आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी प्रसिद्धी प्रसिद्धी पत्रकाद्वारे राज्य शासनाचे आभार मानले आहे. पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात सूट (7.5 हॉर्सपावर पर्यंत क्षमतेच्या विजपंपाचे वीज बिल अगोदरच माफ करण्यात आले आहे. त्यावरील वीज पंपांना सदर सूट लागू असेल) शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरु करणे, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे, शेतीवर आश्रित शेतकरी/मजूर इत्यादी यांना अन्न धान्याची टंचाई होणार नाही याबाबत व्यवस्था उभी करणे, जनावरांना आवश्यक चारा उपलब्ध होईल याची व्यवस्था करणे, जलसंधारणाची कामे सुरु करणे आदी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले.



