*चावरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*चावरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड*
*चावरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-चावरा पब्लिक स्कूल, नंदुरबारच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एका यशाची नोंद झाली आहे. शाळेचा विद्यार्थी दक्षिल दिनेश देवरे याची 14 वर्षांखालील मुलांच्या गटातून नंदुरबार जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा 2026 -27 अंतर्गत S.A. Mission School, Nandurbar येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत दक्षिलने सहभाग घेत उत्कृष्ट कामगिरी केली.
या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर दक्षिलची नंदुरबार जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली. त्याच्या मेहनत, शिस्त, समर्पण आणि खेळाप्रती असलेल्या निष्ठेमुळे त्याचे पालक, शिक्षक तसेच संपूर्ण चावरा पब्लिक स्कूल परिवाराला अभिमान वाटत आहे. या यशासाठी संचालक फादर टेनी, प्रशासक फादर सिजिन, मुख्याध्यापिका सिस्टर जेस्लिन, समन्वयक हर्षदा मॅडम तसेच क्रीडा शिक्षक प्रशांत शिंदे, योगेश मोरे आणि खुशी देसले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
शाळेचे व्यवस्थापन व क्रीडा विभागाच्या वतीने दक्षिल दिनेश देवरेचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, आगामी नंदुरबार जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी त्याला मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.



