*डॉक्टर हिना आणि डॉक्टर सुप्रिया यांनी श्री गणेशाला निरोप देणाऱ्या मिरवणुकीत स्वागत सत्कार करून मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह केला द्विगुणित*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*डॉक्टर हिना आणि डॉक्टर सुप्रिया यांनी श्री गणेशाला निरोप देणाऱ्या मिरवणुकीत स्वागत सत्कार करून मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह केला द्विगुणित*
*डॉक्टर हिना आणि डॉक्टर सुप्रिया यांनी श्री गणेशाला निरोप देणाऱ्या मिरवणुकीत स्वागत सत्कार करून मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह केला द्विगुणित*
नंदुरबार(प्रतिनिधी):-ढोल ताशाच्या गजरात श्री गणेशाला निरोप देण्यासाठी निघालेल्या मंडळांचे स्वागत आणि सत्कार करीत माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि डॉक्टर सुप्रिया गावित यांनी समस्त गणेश भक्तांचा उत्साह द्विगुणित केला. अनंत चतुर्दशीच्या रात्री मानाचे गणपतींच्या आणि नंदुरबार शहरातील लहान मोठ्या गणेश मंडळांच्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुका परंपरागतरीत्या अत्यंत जल्लोषात पार पडल्या. त्याप्रसंगी माजी खासदार डॉक्टर हिना गावित, भाजपाच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित, नगरपालिकेतील विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, अविनाश माळी, नगरसेवक लक्ष्मण माळी, आनंदा माळी यांच्या समवेत मुख्य चौकातील मंडपात रात्री उशिरापर्यंत उपस्थित होते.
विसर्जन मिरवणुकीत सहभागी मंडळांच्या अध्यक्ष उपाध्यक्षांचा डॉक्टर हिना गावित, डॉक्टर सुप्रिया गावित यांनी सन्मान केला. याप्रसंगी संतोष वसईकर, आकाश चौधरी, भीमसिंह राजपूत, दीपक चौधरी, विकी मराठे, रोहन गावित यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.