*माजी मंत्री आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या पाठपुराव्याला यश, जिल्ह्यातील नंदुरबारसह सर्वच तालुके दुष्काळग्रस्त जाहीर, दुष्काळी सवलती लागू केल्यामुळे शेतकऱ्यांनी मानले आभार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माजी मंत्री आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या पाठपुराव्याला यश, जिल्ह्यातील नंदुरबारसह सर्वच तालुके दुष्काळग्रस्त जाहीर, दुष्काळी सवलती लागू केल्यामुळे शेतकऱ्यांनी मानले आभार*
*माजी मंत्री आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या पाठपुराव्याला यश, जिल्ह्यातील नंदुरबारसह सर्वच तालुके दुष्काळग्रस्त जाहीर, दुष्काळी सवलती लागू केल्यामुळे शेतकऱ्यांनी मानले आभार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-विधानसभा मतदारसंघातील नंदुरबार तालुक्यात खरीप हंगाम 2026 साठी Trigger-1 (प्रथम कळ) लागू झाल्यानंतर दुष्काळी उपाययोजना लागू करण्याचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पर्जन्यतूट व पिकांच्या परिस्थितीबाबत सातत्याने पाठपुरावा करून दुष्काळी उपाययोजना लागू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार महाराष्ट्र शासनाच्या 25 सप्टेंबर रोजीच्या शासन निर्णयात नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर, तळोदा व अक्राणी या सहा तालुक्यांचा Trigger-1 अंतर्गत समावेश करण्यात आला आहे. या निर्णयानुसार जमीन महसुलात सूट, पीक कर्ज पुनर्गठन, कृषी कर्ज वसुलीस स्थगिती, वीजबिलात सूट, परीक्षा शुल्क माफी, रोजगार हमीची कामे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, चारा उपलब्धता आदी उपाययोजना लागू होणार आहेत.
या शासन निर्णयाबद्दल डॉक्टर विजयकुमार गावित, माजी खासदार डॉक्टर हिना गावित, डॉक्टर सुप्रिया गावित यांनी महाराष्ट्र शासन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याबद्दल आमदार डॉ विजय कुमार गावित यांचे जिल्हातील शेतकऱ्यांच्या वतीने आभार मानण्यात आले आहे.