*आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि आई वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्था, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने 29 सप्टेंबर 2026 रोजी वि
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि आई वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्था, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने 29 सप्टेंबर 2026 रोजी वि
*आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि आई वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्था, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने 29 सप्टेंबर 2026 रोजी विशेष ज्येष्ठ नागरिक दरबाराचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-बहुसंख्य घरात कौटुंबिक वादातून आणि संपत्तीच्या संघर्षातून वृद्धांचा विविध स्तरातून शरिरीक, मानसिक, भावनिक छळ व पिळवणूक होतांना पहावयास मिळतात. वृद्धांवर होणारा अत्याचार व सतावणूकी संबंधीच्या वाढत्या तक्रारी विचारात घेवून त्यांच्या जीविताचे व मालमत्तेचे संरक्षण होण्याच्या दृष्टिने जनजागृती व्हावी समस्या ग्रस्त व पिडीत ज्येष्ठ नागरिकांना कुटुंब, समाज व शासनदरबारी न्याय मिळवून देण्यासाठी श्री अग्रवाल समाज, नंदुरबार, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगागव आणि आई वडील व ज्येष्ठ नागरिक कल्याण संस्था, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने 29 सप्टेंबर 2026 रोजी अग्रवाल भवन येथे विशेष ज्येष्ठ नागरिक दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार येथील सुप्रसिद्ध व्यापरी रमेशचंद्र नेमीचंद अग्रवाल यांचे अध्यक्षते खाली आणि जी.टी.पी. कॉलेजचे प्राचार्य एम. जे. रघुवंशी, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य एन. डी. चौधरी, प्राचार्य बी.एस. पाटील, पोलीस निरिक्षक संदिप पाटील, रतनलाल अग्रवाल, अॅड. सिमा खत्री, अॅड. शारदा मराठे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुलभा महिरे आदि प्रमुख अतिथींसह या कार्यक्रमात, महसूल व पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, बटेसिंग भैय्या रघुवंशी विधी महाविद्यालय, नंदुरबार आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबार यांनी उपस्थिती व सहभाग असणार आहे. या दरबारात ज्येष्ठ नागरिकांचे निर्वाह, देखभाल, मालमत्ता व इतर कौटुंबिक समस्या, ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या सामाजिक, आर्थिक कायदेशिर समस्या, ज्येष्ठ नागरिकांशी सबंधीत प्रशासकीय पातळीवरील अडचणी आणि ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षा व सामाजिक तणाव आदि समस्यांवर मार्गदर्शन आणि सहकार्य दिले जाणार असल्याने ज्येष्ठ नागरिकांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश अग्रवाल, बारकू पाटील, आत्माराम इंदिवे, दिलीप साळुंके, देविदास बच्छाव आणि डी. डी. चौधरी हे परिश्रम घेत आहेत.



