*नंदुरबार तालुक्यात शाश्वत स्वच्छतेसाठी प्लास्टिक कचरा संकलन मोहीम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार तालुक्यात शाश्वत स्वच्छतेसाठी प्लास्टिक कचरा संकलन मोहीम*
*नंदुरबार तालुक्यात शाश्वत स्वच्छतेसाठी प्लास्टिक कचरा संकलन मोहीम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत शाश्वत स्वच्छतेसाठी नंदुरबार तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये प्लास्टिक कचरा व घनकचरा व्यवस्थापनासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. गावागावात लोकसहभागाच्या माध्यमातून गाव परिसरातील प्लास्टिक कचरा संकलित करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, प्रकल्प संचालक गणेश मोरे व नंदुरबार पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार तालुक्यात घनकचरा व्यवस्थापनासाठी तसेच स्वच्छता ही सेवा या उपक्रमांतर्गत पंचायत समिती नंदुरबार व अल्कीमी पॉलीवूड या स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी ही मोहीम येत आहे. “दूर ठेवणी प्लास्टिक नी, घाण स्वच्छ राहील, आमना गावं आणि रान!” ही या मोहिमे या मोहिमेची टॅगलाईन करण्यात आली असून या माध्यमातून ग्रामस्थांमध्ये प्लास्टिक कचरा व घनकचरा व्यवस्थापनासाठी जनजागृती करण्यात येत आहे. “आम्हाला गाव आणि रानही स्वच्छ हवे” या भावनेतून गावासोबतच गावालगतचा परिसर, शेतरस्ते, मोकळी मैदाने व ग्रामीण भागातील सार्वजनिक ठिकाणे प्लास्टिकमुक्त करण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न केले जात आहेत. ग्रामस्थ, महिला बचत गट, ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी- कर्मचारी व लोकसहभागाच्या माध्यमातून गावातील तसेच गाव परिसरातील प्लास्टिक कचरा संकलित करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील गावांमध्ये वर्षानुवर्षे साचून राहिलेला प्लास्टिक व जुना कचरा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संकलित करण्यात येत आहे. संकलित प्लास्टिक कचरा एकत्रित करून अल्केमी पॉलीवूड या सामंजस्य करार (MOU) केलेल्या संस्थेकडे हस्तांतरित करण्यात आहे.या मोहिमेमध्ये ग्राम स्तरावरील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी, महिला बचत गट, तांत्रिक सहाय्यक तसेच ग्रामस्थांचा लोकसहभाग महत्त्वाची भूमिका बजावत आहे. अनेक गावांमध्ये वर्षानुवर्षे साचलेला प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात हटविला जात असल्याने गावातील स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाला चालना मिळत आहे. मोहीम यशस्वी करण्यासाठी नंदुरबार पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती अर्चना वाघमळे, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय पाटील, यांच्या मार्गदर्शन व नियोजनानुसार विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) व स्वच्छ भारत मिशनचे कर्मचारी, संबंधित गावाचे ग्रामपंचायत अधिकारी हे गावात जाऊन प्लास्टिक कचरा संकलन, वर्गीकरण, साठवणूक व संबंधित संस्थेकडे हस्तांतरणाबाबत आवश्यक मार्गदर्शन करत आहे. आपले गाव स्वच्छ व सुंदर, प्लास्टिकमुक्त व पर्यावरण पूरक गाव तयार करण्यासाठी या मोहिमेत सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ व तरुणांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे यांनी केले आहे.



