*जी.एस.विद्यामंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाळी Under 19 ॲथलेटिक्स /मैदानी स्पर्धेत दैदिप्यमान यश मिळवत 9 विद्यार्थी जिल्हास्तरावर पात्र*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी.एस.विद्यामंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाळी Under 19 ॲथलेटिक्स /मैदानी स्पर्धेत दैदिप्यमान यश मिळवत 9 विद्यार्थी जिल्हास्तरावर पात्र*
*जी.एस.विद्यामंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाळी Under 19 ॲथलेटिक्स /मैदानी स्पर्धेत दैदिप्यमान यश मिळवत 9 विद्यार्थी जिल्हास्तरावर पात्र*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथे जिल्हास्तर क्रीडा स्पर्धेत शहादा तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी उपलब्ध नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय तालुका मैदानी स्पर्धेत जी.एस. विद्यामंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाळी येथील खेळाडूंनी मैदानी खेळ प्रकारात विविध स्पर्धेत यश प्राप्त केले असून सर्व विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर शाळेचे व तालुक्याचे प्रतिनिधित्व करायचे संधी उपलब्ध झाली आहे विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे संस्थेचे चेअरमन मोतीलाल फकीरा पाटील, व्हाईस चेअरमन हिरालाल पटेल, सचिव ए. के.पाटील संचालक तथा शहादा नगरपरिषद नगराध्यक्ष अभिजीत पाटील, विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. प्रिती पाटील, तज्ञ संचालक एस.पी. पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच जी.एस विद्यामंदिर मुख्याध्यापक ए.आर.चौधरी,पर्यवेक्षक व्ही.एच. जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा समिती प्रमुख चंद्रकांत रायसिंग, संजय पटेल, राकेश पाटील, क्रीडा सपोर्ट स्टाफ राकेश नेरपगार यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशामुळे वडाळी सह परिसरातील नागरिकांनी विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले असून विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे शालेय परिवाराचे देखील आभार मानले.