*शासनाने लादलेल्या अन्यकारक संच मान्यता संदर्भात शहादा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना एकवटली*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शासनाने लादलेल्या अन्यकारक संच मान्यता संदर्भात शहादा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना एकवटली*
*शासनाने लादलेल्या अन्यकारक संच मान्यता संदर्भात शहादा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना एकवटली*
शहादा(प्रतिनिधी):-शासनाने कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक व विद्यार्थी संदर्भात लाभलेल्या अन्यायकारक संच मान्यता कुठल्याही परिस्थितीत खपवून घेणार नाही. शासनाने शिक्षकांसोबत विद्यार्थी व संस्थाचालकांवर देखील अन्याय केला असल्याचे प्रतिपादन कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रा गणेश सोनवणे यांनी केले. नुकताच नंदुरबार जिल्ह्यातील संच मान्यता संदर्भातील टॅब खुला झाल्यामुळे बरीचशी शिक्षक मंडळी अतिरिक्त ठरणार असल्याने शिक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अन्यायकारक संच मान्यता नेमकी काय आहे यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी शेठ वि के शहा विद्यालयात एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. पुढे बोलताना प्रा सोनवणे म्हणाले की विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल बॅचेस वीस ऐवजी 30 करण्यात आल्यामुळे बरीचशी शिक्षक मंडळी ही अतिरिक्त होणार असून. ही संच मान्यता कुठल्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही. स्वाध्याय तासिका, संयुक्त तुकड्यांवरील होणारे अतिरिक्त शिक्षक या विषयावर देखील अत्यंत विस्तृत स्वरूपात प्रा. सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाभरामध्ये हजार पैकी एकूण 250 ते 300 शिक्षक हे अतिरिक्त होतील. केवळ अतिरिक्त यावर शासन थांबेल की नाही की नो वर्क नो मनी या आधारावर शिक्षकांना वेगळाच मार्ग तर दाखवला जाणार नाही ना याची भीती देखील शिक्षकांमध्ये आहे. परंतु प्राध्यापक सोनवणे पुढे म्हणाले की पन्नास वर्षापासून सुरू असलेली प्रचलित संच मान्यच्या आधार घेत कुठलेही प्राध्यापक किंवा शिक्षक वर्ग घरी जाऊ दिल्या जाणार नाही आणि विद्यार्थ्यांचे ह्या जाचक संच मान्यता मुळे खूप मोठया प्रमाणात शैक्षनिक नुकसान होईल परिणामी बरेच विद्यार्थी शिक्षण क्षेत्रात मागसले जातील वैयक्तिक लक्ष न दिल्या मुळे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचे देखील नुकसान ह्या नव्या संच मान्यतेत समावलेले आहे यासाठी संघटना व संघटनेचे पदाधिकारी बांधील आहेत यासाठी गरज पडल्यास मोठ मोठ्या प्रकारचे आंदोलन करावी लागली रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल. गेल्या मार्चपासून महासंघ मोठ्या प्रमाणामध्ये फॉल ऑफ घेत विभाग स्तरावर मोर्चे आयोजित करणे असो की शिक्षण संचालक कार्यालयावर पुणे या ठिकाणी मोर्चा आयोजित केलेला असो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या शर्तीचे प्रयत्न महासंघाकडून होत आहे अशा प्रकारची माहिती त्यांनी यावेळी दिली. या चर्चासत्रामध्ये शिक्षक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सचिव प्राध्यापक अनिल जगदाळे यांनी मांनले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य सुरेखा पाटील, उपप्राचार्य मानव उपगडे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक वाय जी पाटील, जिल्हा सहसचिव प्राध्यापक प्रदीप साळुंखे, जिल्हा सदस्य प्रा श्रीमती एन आर पाटील, ज्येष्ठ शिक्षक एस वाय पाटील उपस्थित होते.



