*नंदुरबारमध्ये आज ‘महागणेशोत्सव’2026 चे आयोजन, लोककला, संगीत व नृत्याची रंगणार सांस्कृतिक मेजवानी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबारमध्ये आज ‘महागणेशोत्सव’2026 चे आयोजन, लोककला, संगीत व नृत्याची रंगणार सांस्कृतिक मेजवानी*
*नंदुरबारमध्ये आज ‘महागणेशोत्सव’2026 चे आयोजन, लोककला, संगीत व नृत्याची रंगणार सांस्कृतिक मेजवानी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केले असून, त्यानिमित्त राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई व जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महागणेशोत्सव 2026’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन गुरुवार, 24 सप्टेंबर 2026 रोजी दुपारी 1 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर, नंदुरबार येथे करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा समन्वय अधिकारी शशांक काळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वारशाचे जतन व संवर्धन करण्यासोबतच स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात महाराष्ट्राच्या लोककला, संगीत, नृत्य आणि सांस्कृतिक वैभवाची अनुभूती नागरिकांना घेता येणार आहे. कार्यक्रमात ‘मंगल गणेश’ - गणेश वंदना, ‘गणरंग’ मध्ये- सुरांची मैफल, ‘नृत्यरंग’ मध्ये लोकसंस्कृतीचा जल्लोष आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ हे विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार ॲड. गोवाल पाडवी, विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी, अमरीशभाई पटेल, किशोर दराडे, सत्यजित तांबे, आमदार डॉ. विजयकुमार गावित, शिरीषकुमार नाईक, राजेश पाडवी व आमश्या पाडवी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल आणि पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.



