*जिल्ह्यात 29 सप्टेंबर रोजी "रोजगार महाकुंभ -महाराष्ट्र" चे आयोजन,9 ठिकाणी होणार रोजगार मेळावे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जिल्ह्यात 29 सप्टेंबर रोजी "रोजगार महाकुंभ -महाराष्ट्र" चे आयोजन,9 ठिकाणी होणार रोजगार मेळावे*
*जिल्ह्यात 29 सप्टेंबर रोजी "रोजगार महाकुंभ -महाराष्ट्र" चे आयोजन,9 ठिकाणी होणार रोजगार मेळावे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-देशातील युवकांना रोजगार, स्वयंरोजगार, कौशल्य विकास आणि उद्योजकतेच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने 29 सप्टेंबर 2026 रोजी राज्यभरात एकाच दिवशी 800 ठिकाणी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’ अंतर्गत रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी बाळासाहेब जाधव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. या राज्यव्यापी रोजगार महाकुंभाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. युवकांना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील जिल्हे, तालुके तसेच औद्योगिक परिसरांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नंदुरबार जिल्ह्यात 9 ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये पुढील ठिकाणांचा समावेश आहे.
गजमल तुळशीराम पाटील आर्ट, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज, नंदुरबार
जिजामाता कॉलेज, नंदुरबार
शबरी माता शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नवापूर, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ संचलित औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, शहादा, शेठ व्ही. के. शाह विद्यामंदिर/कै. सौ. जी. एफ. पाटील कनिष्ठ महाविद्यालय, शहादा, सी. एच. चौधरी आर्ट, एस. जी. पटेल कॉमर्स अॅण्ड बाबाजी बी. जे. पटेल सायन्स कॉलेज, तळोदा, आर्ट, कॉमर्स अॅण्ड सायन्स सिनियर कॉलेज, खापर,
कालिका माता मंदिर, सोरपाडा, अक्कलकुवा,
महाराज जनार्दन पोहऱ्या वळवी आर्ट, कॉमर्स अॅण्ड विष्णू कृष्णा कुलकर्णी सायन्स कॉलेज, धडगाव (अक्राणी) अशा 9 ठिकाणी महाकुंभ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दहावी, बारावी उत्तीर्ण, आयटीआय उत्तीर्ण, पदविका व पदवीधारक बेरोजगार युवकांनी या रोजगार मेळाव्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. इच्छुक उमेदवारांनी संबंधित ठिकाणी नोंदणी करून मेळाव्याच्या दिवशी आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहावे. या रोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांकडून थेट मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार आहे. आयटी, बँकिंग, रिटेल, सेल्स, ऑटोमोबाइल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेक्स्टाईल, सर्व्हिस क्षेत्रासह विविध उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. नोंदणी केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी आवश्यक कौशल्ये व सॉफ्ट स्किल्सबाबत संस्थास्तरावर प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच शासनाच्या विविध योजना, कर्ज सुविधा व आर्थिक महामंडळांच्या योजनांबाबत युवकांना मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया मेळाव्याच्या दिवशी पूर्ण करून त्याच दिवशी नियुक्ती आदेश देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी बी. जी. जाधव, संत दगा महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य वाय. एम. पाटील, जिल्हा उद्योग अधिकारी निलेश गायकवाड आणि सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार मंगेश वाघ यांनी केले आहे.



