*देवरे विद्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम व चित्रकला स्पर्धांचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवरे विद्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम व चित्रकला स्पर्धांचे आयोजन*
*देवरे विद्यालयात सेवा संकल्प अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम व चित्रकला स्पर्धांचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-तालुक्यातील आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय, विखरण येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत निर्धारित नियोजनाप्रमाणे स्वच्छता मोहीम आणि चित्रकला स्पर्धेचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी. साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय परिसर, पटांगण,वर्गखोल्या तसेच शाळेच्या सभोवतालच्या परिसरात विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली.'स्वच्छ विद्यालय - सुंदर विद्यालय' आणि 'माझा कचरा - माझी जबाबदारी' अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी जनजागृती केली. प्लास्टिक मुक्त शाळा आणि परिसर स्वच्छ ठेवण्याची प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली. यानंतर निर्धारित नियोजनाप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 'स्वच्छता हीच सेवा', 'पर्यावरण संरक्षण' आणि 'माझे स्वच्छ गाव' या विषयांवर विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्यातून सुंदर चित्रे रेखाटली. स्पर्धेत इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. इको क्लबचे शिक्षक डी.बी. भारती यांनी आपल्या मनोगतातून सेवा संकल्प अभियानाचे महत्त्व विशद करत, विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचा संदेश केवळ शाळेपुरता मर्यादित न ठेवता आपल्या घरात आणि गावात व आपल्या सभोवतालच्या परिसरात पोहोचवावा, वाढत असे आवाहन केले आहे वैयक्तिक जीवनावर आधारित होते व स्पर्धेतील उत्कृष्ट चित्रांचे परीक्षण चित्रकला शिक्षिका. मराठे यांनी केले.विजेत्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक डी. डी. साळुंके यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय. डी.बागुल व आभार प्रदर्शन ए.एस.बेडसे यांनी केले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेबद्दल आणि सामाजिक बांधिलकीबद्दल जागरूकता निर्माण झाली.सदर अभियान व यशस्वीतेसाठी उपशिक्षक एम.डी. नेरकर,डॉ.आरहा.आर.बागुल तसेच जे.एस.पाटील,डी.बी.पाटील,एस.जी.पाटील,एच.एम.खैरनार यांनी संयोजन केले.



