ताजा खबरे:
*इंगळेवाडीतील विविध समस्यांबाबत पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर यांना निवेदन*
*जुवाठीत गणपती गौरीपूजन सोहळा उत्साहात कोकणातील पारंपरिक संस्कृती,श्रद्धा आणि चाकरमान्यांच्या भावनिक नात्याचा सुंदर प्रत्यय*
*‘लोकसंवाद’च्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती,आधार अपडेटेशन,ई- केवायसीसही महाआयडी काढण्याचे आवाहन*
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीतर्फे फार्मसिस्ट दिनानिमित्त कोरीट येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जुवाठीत गणपती गौरीपूजन सोहळा उत्साहात कोकणातील पारंपरिक संस्कृती,श्रद्धा आणि चाकरमान्यांच्या भावनिक नात्याचा सुंदर प्रत्यय*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जुवाठीत गणपती गौरीपूजन सोहळा उत्साहात कोकणातील पारंपरिक संस्कृती,श्रद्धा आणि चाकरमान्यांच्या भावनिक नात्याचा सुंदर प्रत्यय*

  • Share:

*जुवाठीत गणपती गौरीपूजन सोहळा उत्साहात कोकणातील पारंपरिक संस्कृती,श्रद्धा आणि चाकरमान्यांच्या भावनिक नात्याचा सुंदर प्रत्यय*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील जुवाठी गावातील शिर्के वाडी येथे श्री गणपती व गौरीपूजन सोहळा कोकणातील पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शिर्के वाडीतील घराघरांत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. गौरीपूजनानिमित्त महिलांनी पारंपरिक पद्धतीने गौरींची पूजा, आरती, ओटी भरणे तसेच विविध धार्मिक विधी पार पाडले. पारंपरिक वेशभूषेत महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत या सोहळ्याची शोभा वाढवली. मुंबईसह विविध शहरांमध्ये नोकरी, व्यवसाय आणि रोजगारानिमित्त राहणारे कोकणातील चाकरमानी गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने आपल्या मूळ गावी परततात. यामागे केवळ गणपतीची पूजा-अर्चा हे कारण नसून गणपती बाप्पा, घरची माणसं, गावची माती, नातेसंबंध आणि कोकणातील पारंपरिक संस्कृती यांच्याशी असलेले घट्ट भावनिक नाते हेच यामागचे खरे कारण असल्याचे अनंत कदम यांनी सांगितले. वर्षभर नोकरी, व्यवसाय आणि शहरातील धावपळीच्या जीवनात व्यस्त असलेले चाकरमानी गणेशोत्सवाच्या काळात आपल्या गावाकडे परततात. कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थांसोबत गणेशोत्सव साजरा करताना जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि आपल्या मातीशी असलेले नाते पुन्हा घट्ट होते. त्यामुळे गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सण न राहता माणसांना आपल्या मुळांशी, कुटुंबाशी आणि गावाशी पुन्हा जोडणारा उत्सव ठरतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिर्के वाडीतील ज्येष्ठ महिलांनीही गणेशोत्सव आणि गौरीपूजनाच्या परंपरेबाबत आपली मनोगते व्यक्त केली. अनेक वर्षांपासून जपल्या जात असलेल्या गणपती-गौरीपूजनाच्या पारंपरिक प्रथा, रूढी आणि संस्कार आजच्या पिढीनेही पुढे नेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि गावातील माणसं एकत्र येतात. या काळात जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि आपुलकीचे नाते अधिक दृढ होते, अशी भावना ज्येष्ठ महिलांनी व्यक्त केली.
बदलत्या काळातही कोकणातील पारंपरिक गणेशोत्सवाची संस्कृती, धार्मिक परंपरा आणि कौटुंबिक संस्कार पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. आधुनिक जीवनशैलीच्या काळातही आपल्या पूर्वजांनी जपलेल्या परंपरांचे महत्त्व नव्या पिढीला समजावून सांगणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. शिर्के वाडीतील या सोहळ्यात ग्रामस्थ, महिला, युवक तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गणरायाच्या आरतीच्या वेळी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या या उत्सवातून कोकणातील संस्कृती, परंपरा, श्रद्धा आणि सामाजिक एकोपा यांचे सुंदर दर्शन घडले. कोकणची माती, गणपती बाप्पावरील श्रद्धा आणि आपल्या माणसांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते यामुळेच गणेशोत्सवाच्या काळात मुंबईसह विविध शहरांतील चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात परततात. शहरातील धावपळीच्या जीवनातून काही दिवस गावच्या मातीत, आपल्या कुटुंबासोबत आणि आपल्या संस्कृतीच्या सान्निध्यात घालवण्याची ही परंपरा आजही कोकणवासीयांच्या मनात तितकीच जिवंत आहे. शिर्के वाडीतील गणपती -गौरीपूजन सोहळ्याने याच भावनिक नात्याचा आणि कोकणच्या समृद्ध परंपरेचा सुंदर प्रत्यय दिला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*इंगळेवाडीतील विविध समस्यांबाबत पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर यांना निवेदन*
September, 23 2026
*जुवाठीत गणपती गौरीपूजन सोहळा उत्साहात कोकणातील पारंपरिक संस्कृती,श्रद्धा आणि चाकरमान्यांच्या भावनिक नात्याचा सुंदर प्रत्यय*
September, 23 2026
*‘लोकसंवाद’च्या माध्यमातून शासकीय योजनांची जनजागृती,आधार अपडेटेशन,ई- केवायसीसही महाआयडी काढण्याचे आवाहन*
September, 23 2026
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय रोल बॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी*
September, 23 2026
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीतर्फे फार्मसिस्ट दिनानिमित्त कोरीट येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर*
September, 22 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज