*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीतर्फे फार्मसिस्ट दिनानिमित्त कोरीट येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीतर्फे फार्मसिस्ट दिनानिमित्त कोरीट येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीतर्फे फार्मसिस्ट दिनानिमित्त कोरीट येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामडोद, नंदुरबार यांच्या वतीने National Pharmacy Welfare Association (NPWA) यांच्या सहकार्याने मंगळवारी (22 सप्टेंबर) कोरीट येथील कै. डी. गवित माध्यमिक विद्यालयात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती निर्माण करणे आणि नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व पटवून देणे हा होता. शिबिरात सामान्य आरोग्य तपासणी, रक्तदाब, रक्तातील साखर, BMI व वजन तपासणी, तसेच आरोग्यविषयक जनजागृती व समुपदेशन करण्यात आले. यावेळी 100 ते 120 विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. पंकज चौधरी यांनी शिबिराची माहिती देताना नियमित आरोग्य तपासणीमुळे आरोग्याच्या समस्या वेळीच लक्षात येण्यास मदत होते, असे सांगितले. निरोगी जीवनशैली आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले. या आरोग्यविषयक उपक्रमाचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती योगिता गणेश पाटील व सचिव गणेश गोविंद पाटील यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



