*लोककला महोत्सव 2026 मध्ये जिल्हा परिषद कन्या शाळा प्रकाशाचे उत्कृष्ट सादरीकरण ‘झुंजू मुंजू पहाट झाली’ या समूह लोकनृत्याने वेधले रसिकांचे लक्ष*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*लोककला महोत्सव 2026 मध्ये जिल्हा परिषद कन्या शाळा प्रकाशाचे उत्कृष्ट सादरीकरण ‘झुंजू मुंजू पहाट झाली’ या समूह लोकनृत्याने वेधले रसिकांचे लक्ष*
*लोककला महोत्सव 2026 मध्ये जिल्हा परिषद कन्या शाळा प्रकाशाचे उत्कृष्ट सादरीकरण ‘झुंजू मुंजू पहाट झाली’ या समूह लोकनृत्याने वेधले रसिकांचे लक्ष*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्राची समृद्ध लोककला, संस्कृती आणि परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासोबतच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने बालरंगभूमी परिषद, मध्यवर्ती शाखा मुंबई यांच्या वतीने लोककला महोत्सव 2026 आयोजित करण्यात आला. बालरंगभूमी परिषदेच्या राज्य अध्यक्षा अॅड. नीलम शिर्के- सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली बालकांच्या कलाविष्काराला प्रोत्साहन देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.
लोककलेचे स्वरूप केवळ महोत्सव किंवा मनोरंजनापुरते मर्यादित न राहता ती एक व्यापक लोकचळवळ बनावी, लोककलांची माहिती व महती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी तसेच गायन, वादन आणि नृत्य या क्षेत्रांत विद्यार्थ्यांना ज्ञान व कौशल्य आत्मसात करण्याची संधी मिळावी, या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.
नंदुरबार बालरंगभूमी परिषदेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद नंदुरबारच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीमती क्रांती आरसूड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी बालरंगभूमी परिषद नंदुरबार जिल्हाध्यक्ष नागसेन पेंढारकर, विलास पवार, रमाकांत पाटील, कार्यवाहक राजेश जाधव, कार्याध्यक्ष मनोज सोनार, उपाध्यक्ष भिमसिंग वळवी तसेच बालरंगभूमी परिषद नंदुरबारचे पदाधिकारी उपस्थित होते.
या महोत्सवात जिल्हा परिषद कन्या शाळा, प्रकाशा येथील विद्यार्थिनींनी समूह लोकनृत्याच्या माध्यमातून ‘झुंजू मुंजू पहाट झाली’ या गीताचे मनमोहक सादरीकरण केले. पारंपरिक लोककलेचा बाज, तालबद्ध नृत्याविष्कार, उत्स्फूर्त भावमुद्रा आणि विद्यार्थिनींच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे कार्यक्रमस्थळी उपस्थित रसिकांची मने जिंकली. विद्यार्थिनींच्या या उत्कृष्ट कलाविष्काराला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.
विद्यार्थिनींच्या या यशस्वी सादरीकरणामागे शहादा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी डी. डी. राजपूत, शिक्षण विस्तार अधिकारी सुनील तावडे, केंद्रप्रमुख मनोज पिंजारी आणि मुख्याध्यापक रवींद्र पाटील यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन लाभले.
तसेच विद्यार्थिनींच्या सादरीकरणाची तयारी करून घेण्यासाठी शिक्षिका नूतन पाटील आणि शिक्षक गोपाल गावित यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थिनींनी लोक कलेतील विविध पैलू आत्मसात करत आत्मविश्वासाने रंगमंचावर आपली कला सादर केली.
लोककला ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाची ओळख असून, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आपल्या लोकपरंपरा, संस्कृती आणि कलेविषयी जिव्हाळा निर्माण होण्यास मदत होते. लोककला महोत्सव 2026 मधील जिल्हा परिषद कन्या शाळा प्रकाशाच्या विद्यार्थिनींचे सादरीकरण हे शालेय शिक्षणासोबतच कला, संस्कृती आणि संस्कारांची सांगड घालणाऱ्या उपक्रमाचे प्रेरणादायी उदाहरण ठरले.



