*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी*
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने 21 सप्टेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत के.आर. पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
14 वर्षांखालील मुलांच्या गटातून सौर्य रंजीत पाडवी, हानविक रंजीतसिंग हुरेज, सार्थक आशीष सोनार, दक्ष चतुर निकवाडे आणि यश रामाकांत पाटील यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
तसेच 14 वर्षांखालील मुलींच्या गटातून कल्याणी जलसिंग तडवी, लावण्या मुकेश कोकणी आणि प्रतिमा जलमा वसावे यांनी उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष किशोर वाणी, उपाध्यक्ष सिद्धार्थ वाणी प्राचार्या डॉ. छाया शर्मा, उपप्राचार्य, समन्वयक, शिक्षकवृंद व पालकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षक योगेश Bedarkar, निशंक दिवाकर, रोहित महाले यांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण के.आर. पब्लिक स्कूल परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.



