*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे वस्तीशाळा निमशिक्षकांना प्राथमिक शिक्षक भरती प्रकरण, योग्य निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण आदेश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे वस्तीशाळा निमशिक्षकांना प्राथमिक शिक्षक भरती प्रकरण, योग्य निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण आदेश*
*मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे वस्तीशाळा निमशिक्षकांना प्राथमिक शिक्षक भरती प्रकरण, योग्य निर्णय घेण्याचे आदेश*
नंदूरबार(प्रतिनिधी):- मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर यांचे वस्तीशाळा निमशिक्षकांना प्राथमिक शिक्षक भरती प्रकरण, योग्य निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण आदेश. याचिकाकर्ते अशोक दामजी वसावे, राहणार काकरपाटी, तालुका धडगाव, यांनी सचिव - शालेय शिक्षण व क्रीडा विभाग - मंत्रालय, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी-जिल्हा परिषद, तसेच गट शिक्षण अधिकारी यांच्या विरुद्ध मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे वस्तीशाळा निमशिक्षकांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून सेवेत सामावून घेण्याबाबत संदर्भात देण्यात आलेल्या निवेदनावर निर्णय घेण्यासाठी रिट याचिका दाखल केली होती. थोडक्यात माहिती अशी कि, याचिकाकर्ते यांची विशेष कृती आराखडा वस्ती शाळेत स्वयंसेवी शिक्षक म्हणून काम करण्यासंदर्भात दाखला देण्यात आला होता.शासन निर्णयचाही संदर्भ देण्यात आला होता. कक्ष अधिकारी - महाराष्ट्र शासन, यांनी वस्ती शाळा स्वयंसेवक निमशिक्षक यांना प्राथमिक शिक्षक पदी नियुक्ती देणे बाबत पत्र दिले होते. रिट याचिकांमधील आदेश तसेच शासन निर्णयाचे संदर्भ देण्यात आले होते. वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. परंतू कुठलाही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला नव्हता. माननीय मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगर (न्यायमूर्ती नितीन बी. सूर्यवंशी व न्यायमूर्ती आबासाहेब डी. शिंदे) यांनी दिनांक 22 सप्टेंबर 2026 रोजीच्या न्यायनिर्णयाद्वारे प्रकरणातील सर्व बाबींच्या सखोल विचार करून याचिकाकर्ते यांनी दिलेल्या निवेदनावर माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी 8 आठवड्याच्या आत निर्णय घेण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पारित केलेले आहेत. याचिकाकर्ते तर्फे एडवोकेट गजेंद्र देविचंद जैन (भंसाली) (9518323726) यांनी काम पाहिले.



