*माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी परिवारासह केली मानाच्या दादा आणि बाबा गणपतीची महाआरती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी परिवारासह केली मानाच्या दादा आणि बाबा गणपतीची महाआरती*
*माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी परिवारासह केली मानाच्या दादा आणि बाबा गणपतीची महाआरती*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा विद्यमान भाजपाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार शहरातील नवसाला पावणाऱ्या मानाच्या श्रीमंत दादा गणपती आणि बाबा गणपतीचे दर्शन घेत परिवारासह महा आरती केली.
आठ-नऊ महिन्यांपासून चालू असलेल्या दीर्घ आजाराच्या व उपचारांच्या पार्श्वभूमीवर त्यांची ही उपस्थिती आणि महा आरती मधील सहभाग कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित करणारा म्हटला जात आहे. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ कुमुदिनी गावित, माजी खासदार डॉ हिना गावित, महाराष्ट्राच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा डॉ सुप्रिया गावित यांच्यासह बाबा गणपती मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नागरिक उपस्थित होते.