*मानांकनापलीकडे संस्थात्मक उत्कृष्टतेचा मार्ग- डॉ.योगेश पाटील*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मानांकनापलीकडे संस्थात्मक उत्कृष्टतेचा मार्ग- डॉ.योगेश पाटील*
*मानांकनापलीकडे संस्थात्मक उत्कृष्टतेचा मार्ग- डॉ.योगेश पाटील*
शहादा(प्रतिनिधी):-ग्राम विकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयात PM-USHA Mentorship Programme व IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मानांकनापलीकडे नवीन NAAC चौकटीअंतर्गत संस्थांना सक्षमीकरणातून उत्कृष्टतेकडे’ या विषयावर प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले. NAAC मूल्यांकनकर्ता डॉ. योगेश पाटील यांनी गुणवत्ता ही केवळ मानांकनापुरती मर्यादित नसून संस्थात्मक परिवर्तनाची सातत्यपूर्ण प्रक्रिया असल्याचे स्पष्ट केले. परिणामाधिष्ठित शिक्षण, विद्यार्थी- केंद्रित अध्यापन, संशोधन, नवोपक्रम, पुराव्याधिष्ठित कार्यपद्धती, प्रभावी IQAC व सातत्यपूर्ण गुणवत्ता सुधारणा यावर त्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील होते. त्यांनी ज्ञानाचे प्रत्यक्ष संस्थात्मक कार्यात रूपांतर करण्याचे आवाहन केले. प्रा. शिवानंद दुथडे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.



