*आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे व्यायाम शाळा,गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या सत्कार*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे व्यायाम शाळा,गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या सत्कार*
*आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे व्यायाम शाळा,गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या सत्कार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळातर्फे गणपती विसर्जन मुख्य मिरवणुकीत सहभागी व्यायाम शाळा, गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या सत्कार शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आला. नंदुरबार शहरात पहिल्या टप्प्यातील श्रींच्या विसर्जन मिरवणुका शांततेत पार पडल्या. गणपती मंदिर चौकात आ.चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाने मंडपाची व्यवस्था केली होती. सायंकाळी शिवलाल सोनार यांच्या प्रथम मानाच्या पालखी गणपतीच्या पदाधिकाऱ्यांच्या सत्कार झाल्यानंतर रांगेत येणाऱ्या मुख्य मिरवणुकीत सहभागी सर्वच व्यायाम शाळा व गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांच्या शाल, श्रीफळ देऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड राम रघुवंशी यांनी सत्कार केला. यावेळी नगरसेवक किरण रघुवंशी, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक यशवर्धन रघुवंशी, माजी नगरसेवक गजेंद्र शिंपी यांच्यासह आ. चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.



