*सेवा अभियानास कृतीची जोड द्या-मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सेवा अभियानास कृतीची जोड द्या-मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल*
*सेवा अभियानास कृतीची जोड द्या-मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सेवा संकल्प अभियान हे अभियाना पुरते मर्यादित न राहता त्याला प्रत्यक्षात कृतीची जोड द्यावी. सेवा अभियानाच्या माध्यमातून शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांच्या लाभ अतिदुर्गम ग्रामस्थांपर्यंत पोहोचवावा असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी केले.
नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीत आयोजित सेवा संकल्प अभियान व स्वच्छता ही सेवा या उपक्रमांच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल बोलत होते. सेवेला कृती जोड दिल्यास नंदुरबार सारख्या अतिदुर्गम व आदिवासी जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण व स्वच्छता यासारख्या सुविधा पोहोचवून ग्रामस्थांचे जीवनमानात परिवर्तन होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल. यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.17 सप्टेंबर ते दिनांक 17 ऑक्टोबर दरम्यान सुरु राहणाऱ्या या सेवा संकल्प अभियानात जिल्हा, तालुका व ग्रामस्तरावर कार्यरत कर्मचाऱ्यांनी आपले 100 टक्के योगदान द्यावे असेही मुख्य कार्यकारी अधिकारी गोयल यांनी आवाहन केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनीही उपस्थित कर्मचाऱ्यांना सेवा संकल्प अभियान कालावधीत राबवावयाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
कार्यक्रमास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक परमेश्वर राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन विभाग)तथा जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक गणेश मोरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) भानुदास रोकडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण देवरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी हरिभाऊ हाके आदीसह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
यावेळी उपस्थित कर्मचारी यांना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार यांनी सेवा संकल्प अभियान व स्वच्छतेची शपथ दिली. यानंतर एक पेड मॉ के नाम उपक्रमांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल व सर्व विभाग प्रमुखांच्या हस्ते प्रशासकीय इमारतीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास सर्व कर्मचारी उपस्थित होते. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार दिनांक 17 सप्टेंबर ते दिनांक 2 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा जिल्हास्तरीय शुभारंभ मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या उपस्थितीत स्वच्छतेसाठी श्रमदान करून करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारात कर्मचाऱ्यांनी श्रमदान करुन परिसर स्वच्छ केला. श्रमदानात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक परमेश्वर राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक गणेश मोरे आदींसह सर्व विभाग प्रमुख सहभागी झाले होते. परिसर स्वच्छतेनंतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयाची स्वच्छता करून अभिलेखे वर्गीकरण करण्यात आले. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचीही शपथ देण्यात आली.



