*मतदार नोंदणीसाठी 19,20,26 व 27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन,नंदुरबार जिल्ह्यात प्रशासनाची विशेष तयारी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*मतदार नोंदणीसाठी 19,20,26 व 27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन,नंदुरबार जिल्ह्यात प्रशासनाची विशेष तयारी*
*मतदार नोंदणीसाठी 19,20,26 व 27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन,नंदुरबार जिल्ह्यात प्रशासनाची विशेष तयारी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-2026 अंतर्गत मतदार यादी अद्ययावत करण्याची महत्त्वपूर्ण कार्यवाही वेगात सुरू आहे. या अंतर्गत नागरिकांच्या सोयीसाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, असे उप जिल्हा निवडणूक अधिकारी कल्पना ठुबे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे. या कार्यक्रमांतर्गत नागरिकांना नवीन मतदार म्हणून नाव नोंदवणे, मतदार यादीतील विद्यमान नोंदींमध्ये आवश्यक दुरुस्ती करणे तसेच नाव वगळण्यासाठी अर्ज करण्याची सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याकरिता नमुना 6, 7 व 8 चे अर्ज पुरेशा प्रमाणात स्थानिक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विशेष शिबिरांचे वेळापत्रक व स्वरूप: शिबिराचे दिनांक 19, 20, 26 आणि 27 सप्टेंबर 2026
वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत. स्थळ: जिल्ह्यातील संबंधित सर्व मतदान केंद्र. उपलब्ध सुविधा नवीन मतदार नोंदणी अर्ज स्वीकारणे, विद्यमान नोंदी दुरुस्ती व नाव वगळणीचे अर्ज घेणे. शिबिरांमध्ये महिला तसेच दिव्यांग नागरिकांच्या समावेशकतेला विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. राज्यातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाचा कालावधी 31 ऑगस्ट 2026 ते 30 सप्टेंबर 2026 असा निश्चित करण्यात आला आहे. या निर्धारित कालावधीत नागरिकांनी नवीन मतदार नोंदणी तसेच मतदार यादीतील नोंदींची दुरुस्ती व नाव वगळणीसाठी उपलब्ध करून दिलेल्या या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
नवमतदारांसाठी सुवर्णसंधी, दिनांक 1 ऑक्टोबर 2026 रोजी किंवा त्यापूर्वी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व तरुण नागरिकांना मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा पात्र तरुण नागरिकांनी विशेष शिबिरांना आवर्जून भेट देऊन मतदार म्हणून आपली नोंदणी करावी.
नवीन पात्र मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी व्हावी यासाठी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयांमध्येही विशेष शिबिरे आयोजित करून व्यापक जनजागृती व नोंदणीची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नागरिकांनी आपल्या नावाचा मतदार यादीत समावेश असल्याची खात्री करून घ्यावी आणि आवश्यक असल्यास संबंधित नमुना अर्ज भरावा.
पात्र असलेला एकही नागरिक मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी विशेष प्रयत्न करावेत तसेच नागरीकांनी या विशेष शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.



