*शेवगे आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी चौकशीची मागणी, विद्यार्थिनीला घरी पाठविण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शेवगे आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी चौकशीची मागणी, विद्यार्थिनीला घरी पाठविण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह*
*शेवगे आश्रमशाळेतील विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणी चौकशीची मागणी, विद्यार्थिनीला घरी पाठविण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह*
धुळे(प्रतिनिधी):-आदिवासी विकास विभागांतर्गत शेवगे आश्रमशाळेत इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेणाऱ्या स्व. कुमारी राजश्री भरत साबळे हिचा 16 सप्टेंबर 2026 रोजी घरी आत्महत्येने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थिनीला दि. 9 सप्टेंबर 2026 रोजी आश्रमशाळेतून घरी पाठविण्याच्या निर्णयाबाबत सामाजिक संघटनांकडून गंभीर प्रशासकीय प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. 9 सप्टेंबर रोजी विद्यार्थिनीला घरी पाठविण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाच्या कोणत्या शासन निर्णय, परिपत्रक, आदेश किंवा सक्षम अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीच्या आधारे घेण्यात आला, याची स्पष्ट माहिती प्रशासनाने द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे
पालकांची लेखी संमती, विद्यार्थिनीच्या ताबा हस्तांतरणाची नोंद आणि शाळेच्या रजिस्टरमध्ये आवश्यक नोंदी करण्यात आल्या होत्या का? जर विभागाचे कोणतेही अधिकृत परिपत्रक नसताना विद्यार्थिनीला घरी पाठविले असेल, तर हा निर्णय कोणी घेतला आणि त्याची प्रशासकीय जबाबदारी कोणाची? धुळे जिल्ह्यातील गेल्या एका महिन्यातील ही दुसरी घटना आहे. नवपाडा आश्रम शाळेतही आठवीच्या एका मुलीचा तिच्या घरी मृत्यू झाला होता.
आदिवासी विकास विभागचे अजून किती नियमांचे उल्लंघन अथवा निष्काळजीपणा आदिवासी समाज ने भोगावी? एका आदिवासी विद्यार्थिनीच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर प्रश्न विचारणे हा आरोप नाही तर सत्य, पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची कायदेशीर मागणी आहे. जर या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली नाहीत किंवा चौकशीत विद्यार्थिनीच्या हक्कांवर अन्याय झाल्याचे आढळून आले, तर न्याय मिळवून देण्यासाठी आणि आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षित व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी सामाजिक संघटनांच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड स्वीकारली जाणार नाही. सत्य समोर आलेच पाहिजे आणि जबाबदारी निश्चित झालीच पाहिजे. अशी स्पष्ट मांगनी सामजिक कार्यकर्त्ते गणेश गावीत, संदीप भोये, तानाजी बहिरम, प्रेमचंद सोनवणे, महारू पवार यानी सांगीतले.



