*सेवा संकल्प अभियानानिमित्त 23 सप्टेंबर रोजी त्रूटीपूर्तता शिबीराचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सेवा संकल्प अभियानानिमित्त 23 सप्टेंबर रोजी त्रूटीपूर्तता शिबीराचे आयोजन*
*सेवा संकल्प अभियानानिमित्त 23 सप्टेंबर रोजी त्रूटीपूर्तता शिबीराचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील 25 वर्षांच्या कार्यकाळानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबार कार्यालयाच्या वतीने बुधवार 23 सप्टेंबर 2026 रोजी ‘त्रुटीपूर्तता शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त तथा सदस्य वैशाली हिंगे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. या शिबिरात इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेत तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक वर्ष 2026-2027 मध्ये प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केलेले. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्राचे अर्ज त्रुटीपूर्ततेअभावी समितीकडे प्रलंबित आहेत, अशा विद्यार्थ्यांनी 23 सप्टेंबर रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबार येथील कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून आवश्यक त्रुटींची पूर्तता सादर करावी. विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन समिती कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.



