*बामखेडा महाविद्यालयात हिंदी सप्ताह साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*बामखेडा महाविद्यालयात हिंदी सप्ताह साजरा*
*बामखेडा महाविद्यालयात हिंदी सप्ताह साजरा*
शहादा(प्रतिनिधी):-बामखेडा महाविद्यालयात हिंदी सप्ताह साजरा ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रभाषा हिंदी सप्ताह साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनाने करण्यात आली. या सदर कार्यक्रम हा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सेंटर बँक ऑफ इंडिया शाखेचे शाखाप्रमुख धनराज चौधरी यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्रा.धीरेन्र्द कुमार यादव यांनी केले हिंदी भाषा राजभाषा कशी आहे याबद्दल त्यांनी माहिती दिली तसेच हिंदी भाषा किती सोपी आणि सरळ आहे याबद्दल विविध उदाहरणे दिली. कार्यक्रमाचे प्रमुख धनराज चौधरी त्यांनी आपल्या मनोगतून हिंदी भाषा सर्व भाषांची जननी कशी आहे. यावर प्रकाश टाकला. हिंदी भाषेने स्थानिक मुलींना कसं आपल्या सामावून घेतलं हेही त्यांनी पटवून दिले आणि हिंदी भाषा समाज माध्यमाचे कसं साधन आहे तसेच बँकेतील विविध योजना व त्यामागील खातेदाराचे कोणकोणते फायदे होतात याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी हिंदी भाषेतील साहित्यिकांचे मुलाचे कार्य किती आहे याबद्दल त्यांनी प्रेमचंद महादेवी वर्मा हरिवंश राय बच्चन अशा विविध साहित्यिकांचा आपल्या मनोगत आतून परिचय करून दिला व त्यांच्या साहित्यातील वर्तमानकालीन मूल्य कोणती होती यावेळी त्यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे कार्यक्रमास सूत्रसंचालन भूमिका युवराज सोनवणे या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनींनी केले तर आभार प्रकटन विद्यार्थी विकास कार्यक्रमाधिकारी डॉ.बी. एन.गिरासे यांनी केले सदर कार्यक्रम प्रसंगी हिंदी विभागातील प्रा.अखिलेश कुमार यादव व महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापक केंद्र कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने ग्रंथालयात उपस्थित होते.



