*जागतिक तापमान वाढीचा कृषी उत्पादनावर होणाऱ्या गंभीर परिणामांची दखल घेऊन उपाययोजना करण्याची गरज- योगेश्वर बुवा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जागतिक तापमान वाढीचा कृषी उत्पादनावर होणाऱ्या गंभीर परिणामांची दखल घेऊन उपाययोजना करण्याची गरज- योगेश्वर बुवा*
*जागतिक तापमान वाढीचा कृषी उत्पादनावर होणाऱ्या गंभीर परिणामांची दखल घेऊन उपाययोजना करण्याची गरज-योगेश्वर बुवा*
अक्कलकुवा(प्रतिनिधी):-जागतिक तापमान वाढीचा कृषी उत्पादनावर होणाऱ्या गंभीर परिणामांची दखल घेऊन उपाययोजना करण्याची गरज असे प्रतिपादन प्रमुख व्याख्याते योगेश्वर बुवा यांनी केले. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील राजाभाऊ देशमुख वरिष्ठ महाविद्यालयात जागतिक तापमान वाढ व कृषी उत्पादनावर होणारे परिणाम या विषयावर भूगोल विभागाकडून व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गोरे, महाविद्यालयाचे भूगोल विभागप्रमुख प्रा. डॉ. राजेश मेश्राम तर प्रमुख व्याख्याते प्रा. राजेश डोंगरवार, राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष भूगोल शिक्षक योगेश्वर बुवा, प्रा. नारायण सोनोने आदी उपस्थित होते. जागतिक तापमान वाढ व कृषी उत्पादनावर होणारे परिणाम ही देशपातळीवरीलच नव्हे तर जागतिक पातळीवरील एक मोठी समस्या निर्माण झालेली आहे. यावेळी प्रमुख व्याख्याते योगेश्वर बुवा यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितले की या जागतिक तापमान वाढीचा गंभीर परिणाम कृषी उत्पादनावर होत असून दिवसेंदिवस कृषी उत्पादन घटत चालले असून याचा परिणाम भविष्यकाळातील अन्नधान्य उत्पादनावर होऊ शकतो त्यामुळे जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी शासनाबरोबरच लोक चळवळीची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी प्रा. राजेश डोंगरवार यांनी त्यांच्या व्याख्यानातून जगातील वाढणारे हरितगृह परिणाम व अल निनोचा प्रभाव याचा कृषी उत्पादनावर होणारा परिणाम विशद केला. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गोरे व प्रा. डॉ. राजेश मेश्राम यांनी पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाची असलेली जबाबदारी पार पाडून वृक्ष लागवड करणे काळाची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रा. नारायण सोनोने यांनी मांडले.



