*देवळाली प्रवरा येथे ‘लोक कल्याण मेळावा’ उत्साहात संपन्न पथविक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेसह विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवळाली प्रवरा येथे ‘लोक कल्याण मेळावा’ उत्साहात संपन्न पथविक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेसह विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन*
*देवळाली प्रवरा येथे ‘लोक कल्याण मेळावा’ उत्साहात संपन्न पथविक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेसह विविध शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन*
देवळालीप्रवरा(प्रतिनिधी):-पथविक्रेत्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाईन अर्ज भरून शासनाच्या वतीने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा," असे आवाहन देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांनी केले. देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने शहरातील रस्त्यावर फिरून व्यवसाय करणाऱ्या पथविक्रेत्यांसाठी ‘लोक कल्याण मेळावा’ 16 सप्टेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात पथविक्रेत्यांना पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत कर्ज सुविधा, क्रेडिट कार्ड, घरकुल, एकल महिला सर्वेक्षण, दिव्यांग निधी तसेच विविध शासकीय लोक कल्याणकारी योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन करण्यात आले. मेळाव्यास देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे कार्यालयीन अधिक्षक दिपक जगरवाल, सहा. प्रकल्प अधिकारी सुनील गोसावी, वसुली विभाग प्रमुख रामदास म्हस्के यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व पथविक्रेते उपस्थित होते.
यावेळी पीएम स्वनिधी योजनेंतर्गत नवीन पथविक्रेत्यांच्या कर्ज मागणी अर्जाची नोंदणी, योजनेच्या लाभार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा, क्रेडिट कार्ड बाबत माहिती, तसेच घरकुल व इतर शासकीय योजनांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. पथविक्रेत्यांच्या आर्थिक, सामाजिक विकासासाठी शासनाच्या योजनांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या मेळाव्यामुळे शहरातील पथविक्रेत्यांना स्वतःचा व्यवसाय वाढविण्यासाठी उपलब्ध असलेल्या कर्ज सुविधा व विविध शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळाली. नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे पथविक्रेत्यांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी रामदास म्हस्के, सागर सोनवणे यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी समुदाय संघटिका सविता हारदे यांनी आभार मानले. पथविक्रेता समिती सदस्य सागर सोनवणे, शकील तांबोळी, दीपक बर्डे, यास्मिन पठाण, बसंती दहीवाले, विकासवर्धिनी शहरस्तर संघाच्या अध्यक्षा कमल मुसमाडे यांच्या सह मोठ्या संख्येने फेरीवाले व महिला बचत गट सदस्य उपस्थित होते.



