*नंदुरबार शहर पोलिसांची वाहनचोरी विरोधात कारवाई चोरीस गेलेली रॉयल एनफिल्ड बुलेट हस्तगत,एका संशयितास ताब्यात*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबार शहर पोलिसांची वाहनचोरी विरोधात कारवाई चोरीस गेलेली रॉयल एनफिल्ड बुलेट हस्तगत,एका संशयितास ताब्यात*
*नंदुरबार शहर पोलिसांची वाहनचोरी विरोधात कारवाई चोरीस गेलेली रॉयल एनफिल्ड बुलेट हस्तगत,एका संशयितास ताब्यात*
नंदुरबार(प्रतिनिधी):-11 सप्टेंबर 2026 रोजी रात्री नंदुरबार शहरातील गांधीनगर परिसरातून अज्ञात चोरट्याने रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट अंदाजे 1 लाख 50 किंमतीची मोटरसायकल चोरी करून नेली होती. याबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि. क्र. 807/2026, भारतीय न्याय संहिता, 2023 चे कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास सुरु असताना गुन्हे अन्वेषण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा तसेच अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी तपास व माहिती संकलन सुरु केले. तपासादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सदर मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात सुरज सुनील अहिरे, वय 34 वर्षे व सुनील अहिरे, दोन्ही रा. ओम साई राम नगर, दशरथ नगरजवळ, रामानंद पोलीस स्टेशन रोड, जळगाव, ता. व जि. जळगाव, हल्ली मुक्काम संजय नगर, नंदुरबार यांचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला असता सुरज सुनील अहिरे हा मिळून आला. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेली रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट मोटरसायकल हस्तगत करण्यात आली आहे. तसेच त्याच्याकडून हिरो कंपनीची एचएफ डीलक्स मोटरसायकल देखील मिळून आली असून, सदर वाहनाबाबत पुढील तपास पोलीस हवालदार विशाल नागरे करीत आहेत.
पोलीस निरीक्षक संदिप पाटील, नंदुरबार शहर पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करणारे पथक यामध्ये पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे, पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोहेकों विशाल नागरे, पोहेकॉ जगदीश पाटील, पोकों आनंदा मराठे, पोकों राहुल राठोड, पोकों ललित गवळी, पोकों अमित भरवाड, पोकों विनोद महाजन, पोकों विद्धेश्वर बिरारी, पोकॉ अनिल वसावे व पोकों विवेक ठाकरे, सर्व नेमणूक नंदुरबार शहर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथक, यांनी सहभाग घेतला.



