*गणित संबोध परीक्षेत देवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सुयश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गणित संबोध परीक्षेत देवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सुयश*
*गणित संबोध परीक्षेत देवरे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे सुयश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-विखरण येथील धंगाई विधायक कार्य मंडळ, संचलित आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे महाराष्ट्र गणित अध्यापक मंडळातर्फे आयोजित गणित संबोध परीक्षेत विद्यालयातील 51 विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले त्यात इयत्ता 5 वी वर्गातील 22 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन त्यांपैकी गौरव मराठे, राधिका भील, गणेश बागले, रूपाली तावडे, स्नेहल कोळी, कार्तिक पाटील, निखिल पाटील, रितेश पाटील, मुस्कान ठाकरे या 9 विद्यार्थ्यांनी विशेष प्राधान्य प्राप्त केले आहे. इयत्ता आठवीतील एकूण 29 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ललिता पावबा पाटील हीने विशेष प्राविण्यात यश संपादन केलेले आहे.
विद्यालयाच्या उपशिक्षिका एस. एस.गायकवाड यांना उपक्रमशील शिक्षिका म्हणुन सन्मानित करण्यात आले आहे.vयशस्वी विद्यार्थ्यांना एम.डी. नेरकर, डॉ.आर.आर.बागुल,एस. एस. गायकवाड, सी. व्ही. नांद्रे यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थेचे अध्यक्ष, राजेंद्र देवरे, शालेय समितीच्या अध्यक्षा शैलजा देवरे, सचिव नरेंद्र देवरे, कोषाध्यक्ष सतीश देवरे, मुख्याध्यापक डी.डी. साळुंके, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी तसेच विखरण, नाशिंदा, खापरखेडा बोराळा गावातील पालकांनी व ग्रामस्थांनी कौतुक केले.



