*अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा*
*अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात हिंदी दिवस साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-अभिनव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात तारकेश्वर पटेल यांच्या अध्यक्षतेखाली हिंदी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डी.आर. हायस्कुलचे उपशिक्षक विशाल मच्छले उपस्थित होते. सर्वप्रथम सरस्वती पूजन करून अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक चेतना गोसावी यांनी करून हिंदी दिनाचे महत्व सांगितले. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पोस्टर स्पर्धेचे उदघाटन प्रमुख अतिथी व अध्यक्ष्यांनी केले.
त्यानंतर पहेलिया स्पर्धा, कल्याणी गवळे व दृष्टी पाटील यांनी हिंदी मराठी कहावते स्पर्धा घेतली. यानंतर नोबल पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा परिचय वाचन इ 6 वी क च्या विद्यार्थ्यांनी केले. इयत्ता सहावीचे प्रदीप महाले व सिद्देश बिऱ्हाडे यांनी हिंदी साहित्यावर एकांकिका सादर केली.इयत्ता पाचवी क च्या विद्यार्थ्यांनी पेटूराम पाठाचे मनोरंजनात्मक कृती सादरीकरण केले. तहुरा कुरेशी हिने हिंदी दिनाची माहिती दिली.
शाळेत मुहावरे स्पर्धा घेण्यात आली.त्यात प्रथम तहुरा जफरउल्ला कुरेशी, द्वितीय ईशानी वसंत पवार, तृतीय, उत्तेजनार्थ नव्या गणेश पाटील, हिमांशी जाधव, पोस्टर स्पर्धेतील यशस्वी प्रथम कृष्णा जितेंद्र पाटील, द्वितीय तहुरा कुरेशी, तृतीय डिम्पल जाधव, मोठा गट विज्ञापन लेखन स्पर्धेतील यशस्वी प्रथम लोकेश पाटील, द्वितीय दक्ष चौधरी, तृतीय हार्दिक चौधरी, तसेच पोस्टर स्पर्धेतील प्रथम गौशियांनाज पिरजादा, द्वितीय लोकेश पाटील, तृतीय दक्ष चौधरी, उत्तेजनार्थ आचल गवळे, कल्याणी गवळे, यांचा कंपास बॉक्स. लेखन पॅड, पेन देऊन सत्कार करण्यात आला.
प्रमुख अतिथी विशाल मच्छले यांनी हिंदी दिवसाचे महत्व आणि प्रचार प्रसार यावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि शाळेत राबविण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धा, विज्ञापन स्पर्धा व मुहावरे स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि हिंदी दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन आणि आभार तिलोत्तमा चौधरी यांनी मानले.



