*गणपती आगमनाचे चित्र रेखाटन करत एक अनोखा संदेश देण्याचे काम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गणपती आगमनाचे चित्र रेखाटन करत एक अनोखा संदेश देण्याचे काम*
*गणपती आगमनाचे चित्र रेखाटन करत एक अनोखा संदेश देण्याचे काम*
शहादा(प्रतिनिधी):-वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयातील कलाशिक्षक धर्मेंद्र तांबोळी हे प्रत्येक सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या कला कुशरीच्या माध्यमातून फळावर चित्र रेखाटन करत असतात. चित्र रेखाटन करण्याचे उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना चित्रकला या विषयाची गोडी निर्माण होणे व सोबतच येणाऱ्या दिवसांमध्ये कुठला सण किंवा उत्सव येणार आहे याची माहिती फळ्यावरील चित्र रेखाटनाच्या माध्यमातून मिळत असते. चित्र रेखाटन करणे हाके व त्यांचे छंद नसून त्यांना चित्र रेखाटनातून एक मनस्वी आनंद मिळत असतो. त्यांच्या या कार्यशैलीचे दखल घेत त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे व विविध संस्थांमार्फत त्यांच्या गौरव देखील करण्यात आलेला आहे. उद्या होऊ घातलेला गणेशोत्सव व गणरायाचे आगमन या पार्श्वभूमीवर त्यांनी फळ्यावर चित्र रेखाटन करताना सर्वांना आकर्षित होईल अशा प्रकारचे रेखाटन केले आहे. गणपती बाप्पा ज्या मार्गातून येत आहे त्या मार्गावर मोठमोठाली खड्डे निर्माण झाली असून शहर खड्डे मुक्त कसे होईल याकडे लक्ष आकर्षण घेणारे चित्र काढले आहे त्यामुळे एक सामाजिक संदेश देखील या माध्यमातून देण्याच्या त्यांनी प्रयत्न केला आहे. शिवाय बाप्पा येत असताना निसर्गचक्राने देखील साथ द्यावी म्हणून सोबत एक बालक छत्री घेऊन त्यांना आणत असल्याचे भावपूर्ण चित्र दाखविले आहे. पावसाळ्यात पाऊस आला नाही त्यामुळे शेतकरी व जनजीवन विस्कळीत झाले होते. आम्ही तुझे थाटात आगमन करतो त्यामुळे तू सोबत येताना पाऊस देखील येत आहे असे भावुक चित्र देखील त्यांनी रंगवण्याच्या प्रयत्न केलेला आहे. हे चित्र पाहण्यासाठी विद्यार्थी व शिक्षकांची मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झाली होती. आता तरी प्रशासनाला जाग येईल का व शहरातील रस्ते खड्डे मुक्त होतील का याकडे विद्यार्थी शिक्षकांचे लक्ष लागून आहे त्यांनी काढलेल्या चित्राचे संस्थेचे सचिव प्रा संजय जाधव, सोना माई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव वर्षा जाधव प्रशासकीय प्रमुख डॉ हिमांशू जाधव, शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील कौतुक केले आहे.



