*कु.यो.ई.म.माध्यमिक विद्यालय सरदारनगर येथे ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत ‘पर्यावरणपूरक मूर्ती निर्मिती कार्यशाळा’ संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*कु.यो.ई.म.माध्यमिक विद्यालय सरदारनगर येथे ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत ‘पर्यावरणपूरक मूर्ती निर्मिती कार्यशाळा’ संपन्न*
*कु.यो.ई.म.माध्यमिक विद्यालय सरदारनगर येथे ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत ‘पर्यावरणपूरक मूर्ती निर्मिती कार्यशाळा’ संपन्न*
तळोदा(प्रतिनिधी):-कु.यो.ई.म. माध्यमिक विद्यालय सरदारनगर, ता. तळोदा, जि. नंदुरबार येथे 12 सप्टेंबर रोजी ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमांतर्गत ‘पर्यावरणपूरक मूर्ती निर्मिती कार्यशाळेचे’ उत्साहात आयोजन करण्यात आले. उपक्रमशील कलाशिक्षक एस.आर.पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. शाळेत आयोजित या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शाडू माती व काळी शेतातील माती यांचा वापर करून विविध आकर्षक व पर्यावरणपूरक मूर्ती तयार केल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून शिकण्याची सुवर्णसंधी मिळाली असून, त्यांनी आपल्या कल्पकतेचा व सर्जनशीलतेचा पुरेपूर वापर करून सुंदर मूर्ती साकारल्या.
उपक्रमाचे प्रमुख उद्देश: कृती कौशल्य: विद्यार्थ्यांमध्ये विविध कृती कौशल्ये विकसित करणे.सर्जनशीलता: नवनिर्मिती व सर्जनशीलतेला योग्य चालना देणे. नैसर्गिक साधनसंपत्ती: माती व नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर समजून सांगणे. पर्यावरणस्नेही दृष्टिकोन: विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबद्दल आणि पर्यावरणा विषयी प्रेम व आदर निर्माण करणे.कला जोपासना: पारंपरिक कला व हस्तकलेची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे.
कार्यक्रमाची यशस्विता व सहभाग:
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना या निमित्ताने उत्तम वाव मिळाला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती.पी.डी. मराठे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करत पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील शिक्षकवृंद डी. एन.देवरे, एस.जे. पावरा, एस.आय. मगरे, के.एम. खैरनार, आर.बी. पाटील,श्रीमती. आर. ए.कलाल, एस.एन.शिरसाठ तसेच शिक्षकेतर कर्मचारी व्ही.एस. शिंदे आणि डी. एच.तडवी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेस विद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



