*सुरगाणा येथे मंथन वेल्फेअर फाऊंडेशन संचलित मंथन राज्य स्तरावरीय सामान्य ज्ञान परीक्षा, ऑलंपियाड स्पर्धा परीक्षा पारितोषिक वितरण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*सुरगाणा येथे मंथन वेल्फेअर फाऊंडेशन संचलित मंथन राज्य स्तरावरीय सामान्य ज्ञान परीक्षा, ऑलंपियाड स्पर्धा परीक्षा पारितोषिक वितरण*
*सुरगाणा येथे मंथन वेल्फेअर फाऊंडेशन संचलित मंथन राज्य स्तरावरीय सामान्य ज्ञान परीक्षा, ऑलंपियाड स्पर्धा परीक्षा पारितोषिक वितरण*
सुरगाणा(प्रतिनिधी):-जीवनात संघर्ष असायलाच हवा
जीवनात संघर्ष असेल तरच पुढे जाऊ शकतो. त्यामुळे जीवना खडतर वाटेवर संघर्ष असलाच पाहिजे असे प्रतिपादन गुलाबी गाव येथील जनकल्याण गोशाळा संचालक पोपटी काका कुबेर यांनी जिल्हा परिषद शाळा सुरगाणा येथे मंथन वेल्फेअर फाऊंडेशन संचलित मंथन राज्य स्तरावरीय सामान्य ज्ञान परीक्षा, ऑलंपियाड स्पर्धा परीक्षा पारितोषिक वितरण प्रसंगी केले. यावेळी व्यासपीठावर विस्तार अधिकारी महेश नेहे, सुनिल पेलमहाले, संजय तांबे, रतन चौधरी, भागवत धुम, सुधाकर भोये आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक कुबेर यांनी सांगितले की
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले नाही तर प्रगती थांबते. माणसाला
परमेश्वराने शंभर वर्षे आयुष्य दिले आहे मात्र राहणीमान,बदलती जीवनशैली, चुकीची दिनचर्या, व्यसनाधीनता, धावपळ, व्यायाम, प्राणयामचा अभाव, शंभर वर्षे जगायचे असेल तर शरीर निरोगी, सुदृढ असले पाहिजे. आदिवासी बांधवांचे जीवन संघर्षमय असते. हे मी तीस वर्षांपूर्वी पासून जवळून अभुभवले आहे. त्यामुळे
उर्वरित आयुष्य आदिवासींच्या विकासासाठी खर्च करायचे आहे. शंभरी ओलांडली तरी हाती काठी घ्यायची नसेल तर प्राणायाम, योगासने, आहार, विहार, चांगल्या सवयींचा विद्यार्थ्यांनी अंगीकार केला पाहिजेत. युवकांच्या
सळसळत्या रक्तातच खरी ताकद असते ती ओळखून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. गती कासवा सारखी असली तरी झेप मात्र गरुडासारखी उतुंग असली पाहिजे. यावेळी जनकल्याण गोशाळा संचालक पोपटी कुबेर यांनी पुणे येथील राहुल मदने यांच्यातर्फे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठ ॲपल कंपनीचे दर्जेदार दहा
चांगले टॅंब सहभागी शाळांमध्ये देऊन शिक्षकांना गौरवण्यात आले. टॅब शाळेत ठेवून सर्व मुलांना वापरता येईल अशी व्यवस्था करण्याचे त्यांनी आवाहन केले.
मंथन सामान्यज्ञान परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे, स्मृतिचिन्हे व पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. यावेळी मधुकर राऊत, रतन चौधरी, एस. के. चौधरी, भागवत धूम, मनोहर भोये, सुधाकर भोये, रामभाऊ थोरात, शशिकांत बागुल, भास्कर झिरवाळ, छगन गावित, योगिता चव्हाण, नारायण महाले, दिलीप ठाकरे, योगिता जाधव, स्मिता दळवी तसेच सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास बागुल यांनी केले. यावेळी गटशिक्षणाधिकारी अल्पा देशमुख यांनी सांगितले की," मंथन स्पर्धा परीक्षा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शोधकवृत्तीला, कल्पकतेला व स्पर्धात्मक वृत्तीला चालना देणारा असा उपक्रम आहे.“विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा, आधुनिक साधनांची जोड आणि समाजातील दानशूर व्यक्तींचे सहकार्य मिळाल्यास ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठी शैक्षणिक झेप घेऊ शकतात,”



