*के.आर.पब्लिक स्कूलमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के.आर.पब्लिक स्कूलमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन*
*के.आर.पब्लिक स्कूलमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):–कन्हैयालाल रावजीभाई पब्लिक स्कूल येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना विविध सामाजिक व कायदेविषयक विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात लैंगिक छळ प्रतिबंधक (पॉक्सो ) कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ तसेच ‘बालविवाहमुक्त भारत’ या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी श्रीमती सीमा खत्री आणि बी. एस. बिरारे यांनी विद्यार्थ्यांना विविध कायद्यांची माहिती देत कायद्याचे पालन करण्याचे आणि समाजात जनजागृती निर्माण करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन किशोर वाणी, डॉ. छाया शर्मा मॅडम तसेच संचालिका सौ. केतकी वाणी यांची उपस्थिती होती. यावेळी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना “आपली सामाजिक जबाबदारी ओळखून कायद्याचे पालन आपण स्वतः करावे आणि इतरांनाही कायद्याचे पालन करण्यासाठी प्रेरित करावे,” असे आवाहन किशोर वाणी यांनी केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता निर्माण करण्यासोबतच सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला विद्यार्थ्यांना अमुल्य माहिती दिली.



