*राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेत चावरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश;तृतीय क्रमांक पटकावला*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेत चावरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश;तृतीय क्रमांक पटकावला*
*राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेत चावरा पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश;तृतीय क्रमांक पटकावला*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथील चावरा पब्लिक स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी सातारा येथे आयोजित राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांक पटकावला. या यशामुळे चावरा पब्लिक स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महाराष्ट्र राज्य रोलबॉल संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सातारा येथे राज्यस्तरीय रोलबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अत्यंत चुरशीच्या या स्पर्धेत चावरा पब्लिक स्कूलचे हर्ष पंकज जाधव (इयत्ता 8 वी-क) आणि आदित्य सुनील निकम (इयत्ता 8 वी-ब) यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. दोन्ही विद्यार्थ्यांनी संपूर्ण स्पर्धेदरम्यान वेग, चपळाई, अचूक पासिंग, उत्तम बचाव आणि संघभावनेचे प्रभावी प्रदर्शन केले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे संघाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आणि त्यांनी तृतीय क्रमांक पटकावला. या यशामागे प्रशिक्षक नंदू पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच क्रीडा शिक्षक प्रशांत शिंदे, योगेश मोरे आणि खुशी देसले यांनी विद्यार्थ्यांना नियमित सराव, कौशल्यविकास आणि स्पर्धेच्या तयारीसाठी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संचालक फादर टेनी, प्रशासक फादर सिजिन आणि मुख्याध्यापिका सिस्टर जेस्लिन यांनी हर्ष जाधव व आदित्य निकम यांचे तसेच प्रशिक्षक आणि क्रीडा विभागाचे अभिनंदन केले. या विद्यार्थ्यांचे यश हे शाळेतील इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरले असून, शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची शाळेची परंपरा यामुळे अधोरेखित झाली आहे. राज्यस्तरावर मिळविलेल्या या यशाबद्दल चावरा पब्लिक स्कूल परिवाराकडून दोन्ही विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.



