*वनवासी विद्यालय चिंचपाडा येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*वनवासी विद्यालय चिंचपाडा येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा*
*वनवासी विद्यालय चिंचपाडा येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-वनवासी विद्यालय, चिंचपाडा येथे हिंदी दिवस मोठ्या उत्साहात व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद चिंचोले होते. हिंदी विभागप्रमुख श्रीमती सुवर्णा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील विद्यार्थिनी गुंजन बिराडे, सपुरा खाटीक यांनी व कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप देसले यांनी केले.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रेमल पाडवी यांनी हिंदी भाषेचे महत्त्व, तिची समृद्ध परंपरा आणि दैनंदिन जीवनातील हिंदी भाषेचे स्थान याविषयी मार्गदर्शन केले.
हिंदी दिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, कविता, नाटिका तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध कार्यक्रमांमध्ये विद्यालयातील तब्बल 50 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या मंचावर ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती शैलजा कापडिया तसेच ज्येष्ठ शिक्षक राजेश गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टेक्निकल टीममधील संदीप महाले, कांतीलाल वसावे, संदीप आहेर व प्रीतम यांनी विशेष सहकार्य केले.
यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण विद्यालयात हिंदी भाषेबद्दलचा उत्साह आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले.



