*गणेशस्थापना उत्साहात;‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*गणेशस्थापना उत्साहात;‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला*
*गणेशस्थापना उत्साहात;‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने परिसर दुमदुमला*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बामदोड येथे गणेश चतुर्थीनिमित्त श्री गणरायाची भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात विधिवत स्थापना करण्यात आली. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण महाविद्यालय परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. आकर्षक सजावट, फुलांची आरास आणि प्रसन्न वातावरणामुळे गणेशस्थापना सोहळ्याला विशेष रंगत आली.
विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत गणरायाचे स्वागत केले. विधिवत पूजन, आरती आणि प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता विद्यार्थ्यांमध्ये एकता, सहकार्य, नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि भारतीय संस्कृतीविषयी अभिमान निर्माण करणारा उपक्रम ठरला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती योगिता गणेश पाटील व सचिव गणेश गोविंद पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाचे कौतुक करून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. प्राचार्य डॉ. पंकज एम. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. सर्वांच्या सामूहिक सहभागातून गणेशस्थापना सोहळा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.



