*नंदुरबारमध्ये शिंदे गटाला भागदाड, शिंदे सेनेचे अल्पसंख्यांक शहर प्रमुख हारून रशीद हलवाई यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*नंदुरबारमध्ये शिंदे गटाला भागदाड, शिंदे सेनेचे अल्पसंख्यांक शहर प्रमुख हारून रशीद हलवाई यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश*
*नंदुरबारमध्ये शिंदे गटाला भागदाड, शिंदे सेनेचे अल्पसंख्यांक शहर प्रमुख हारून रशीद हलवाई यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहरातील राजकीय वर्तुळात आज मोठी राजकीय घडामोड घडली. शिंदे सेनेचे नंदुरबार शहर अल्पसंख्यांक शहर प्रमुख तथा माजी नगरसेवक श्री. हारून रशीद हलवाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटात प्रवेश केला. नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश पार पडला. हारून हलवाई हे नंदुरबार शहरातील अल्पसंख्यांक समाजामध्ये चांगला जनसंपर्क व प्रभाव असलेले नेतृत्व म्हणून परिचित आहेत. ते माजी नगरसेवक असून, विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाला शहराच्या राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. हा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित दिलीप मोरे यांच्या पुढाकाराने करण्यात आला. हारून रशीद हलवाई यांच्या प्रवेशामुळे नंदुरबार शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढण्यास मदत होणार असून, अल्पसंख्यांक समाजातील पक्षाचा जनाधार अधिक मजबूत होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पक्षप्रवेशानंतर नंदुरबार शहराच्या राजकारणात “शिंदे गटाला मोठा धक्का” अशी चर्चा रंगली असून, आगामी काळात या प्रवेशाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष निंबा माळी, तळोद्याचे तालुकाध्यक्ष योगेश चौधरी, सरचिटणीस मधुकर पाटील, कोषाध्यक्ष मॉन्टू जैन, तालुकाध्यक्ष श्री. योगेश पाटील, तसेच बबलू कदमबांडे, सुनील भाबड, मोहन ढोणे, प्रमोद महाजन, रिषी शर्मा, जावरे नाना यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हारून रशीद हलवाई यांच्या प्रवेशामुळे नंदुरबार शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसला नवे बळ मिळाले असून, आगामी राजकीय समीकरणांमध्ये या प्रवेशाची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याची चर्चा आहे.



