ताजा खबरे:
*कावड यात्रेला सहकार्य करणाऱ्या भाविकांचा सन्मान, पुढील वर्षी सर्वात मोठी कावड यात्रा काढण्याचा संकल्प*
*'श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून राज्यभर भक्तांची मोफत आरोग्य तपासणी-मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा पुढाकार*
*जिल्ह्यात आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत,जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन*
*धडगाव येथे नोकरी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न*
*गणित संबोध परीक्षेत एस.ए.मिशन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश,70 विद्यार्थी उत्तीर्ण*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*कावड यात्रेला सहकार्य करणाऱ्या भाविकांचा सन्मान, पुढील वर्षी सर्वात मोठी कावड यात्रा काढण्याचा संकल्प*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*कावड यात्रेला सहकार्य करणाऱ्या भाविकांचा सन्मान, पुढील वर्षी सर्वात मोठी कावड यात्रा काढण्याचा संकल्प*

  • Share:

*कावड यात्रेला सहकार्य करणाऱ्या भाविकांचा सन्मान, पुढील वर्षी सर्वात मोठी कावड यात्रा काढण्याचा संकल्प*
नरसी(प्रतीनिधी):-नायगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र राहेर ते नरसी दरम्यान नुकत्याच पार पडलेल्या भव्य कावड यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात सहकार्य करणाऱ्या दानशूर व्यक्ती, भाविक व ग्रामस्थांचा सिद्धेश्वर महादेव मंदिर, नरसी येथे 9 सप्टेंबर रोजी सन्मान करण्यात आला. धार्मिक श्रद्धेसोबत सामाजिक बांधिलकी जपत अन्नदान, चहा, पिण्याचे पाणी, फराळ, अल्पोपहार, वाहन व्यवस्था तसेच आर्थिक स्वरूपात योगदान देणाऱ्या सेवाभावी व्यक्तींचा यावेळी गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे नेते तथा नायगाव पंचायत समितीचे माजी सभापती श्रावण पाटील भिलवंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून वेदशास्त्र संपन्न संदीप महाराज जोशी, पोलीस पाटील इब्राहिम बेग पटेल, माजी उपसरपंच नजीरसाब बागवान, सय्यद इस्माईलसाब, ज्येष्ठ पत्रकार गंगाधर पाटील भिलवंडे व पवन गादेवार उपस्थित होते. श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर, नरसी येथून 25 ऑगस्ट रोजी कावड यात्रेला प्रारंभ झाला होता. राहेर ते नरसी या मार्गावरून निघालेल्या या यात्रेत मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घेतला. भगवान महादेवाच्या भक्तीमय जयघोषात मार्गक्रमण करणाऱ्या कावडधारी भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मार्गावरील विविध गावांमध्ये सामाजिक कार्यकर्ते, मान्यवर व ग्रामस्थांच्या पुढाकारातून पिण्याचे पाणी, चहा, फराळ, अल्पोपहार तसेच वाहनांसह विविध सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
कावड यात्रा हा केवळ धार्मिक सोहळा न राहता सेवा, श्रद्धा आणि सामाजिक एकोपा यांचा संगम ठरला. भाविकांच्या सेवेसाठी विविध स्तरांतून मिळालेल्या सहकार्याची दखल घेत दानशूर व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. अन्नदानापासून आर्थिक मदतीपर्यंत विविध स्वरूपात योगदान देणाऱ्या सेवाभावी व्यक्तींचा गौरव झाल्याने उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण होते.
यावेळी श्री सिद्धेश्वर मंदिराचे अध्यक्ष साईनाथ अक्कमवाड, श्रीनिवास अक्कमवाड, नारायण देवशेटवार, अनिल श्रीरामवार, संतोष तमेवार, जेष्ठ पत्रकार गंगाधर गंगासागरे, कैलास तेलंग, गोविद टोकलवाड, प्रल्हाद भंडारे, गणेश कंदुरके, हनमंत चंदनकर, गुरमित अरोरा, संतोष जुकलकर यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना भाजपा नेते श्रावण पाटील भिलवंडे यांनी कावड यात्रेला भाविक, ग्रामस्थ आणि सेवाभावी दानशूर व्यक्तींकडून मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आगामी काळात अधिक व्यापक नियोजन करून नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी व भव्य कावड यात्रा आयोजित करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. धार्मिक परंपरेचे जतन करण्याबरोबरच समाजातील विविध घटकांना एकत्र आणणारा हा भक्तिमय उपक्रम अधिक व्यापक करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कावड यात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष स्वरूपात योगदान देणाऱ्या सर्व सेवाभावी व्यक्तींचे यावेळी स्वागत व सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ग्रामस्थ, भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कावड यात्रेला सहकार्य करणाऱ्या भाविकांचा सन्मान, पुढील वर्षी सर्वात मोठी कावड यात्रा काढण्याचा संकल्प*
September, 09 2026
*'श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून राज्यभर भक्तांची मोफत आरोग्य तपासणी-मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा पुढाकार*
September, 09 2026
*जिल्ह्यात आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत,जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे आयोजन*
September, 09 2026
*धडगाव येथे नोकरी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न*
September, 09 2026
*गणित संबोध परीक्षेत एस.ए.मिशन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश,70 विद्यार्थी उत्तीर्ण*
September, 09 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज