ताजा खबरे:
*धडगाव येथे नोकरी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न*
*गणित संबोध परीक्षेत एस.ए.मिशन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश,70 विद्यार्थी उत्तीर्ण*
*पालकमंत्री हसन मुश्रीफ 10 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर*
*विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) 2026 कार्यक्रम, मतदार यादीत दावे व हरकतीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत, अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध, जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन*
*पावसाच्या खंड काळात पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना कराव्यात-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*धडगाव येथे नोकरी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*धडगाव येथे नोकरी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न*

  • Share:

*धडगाव येथे नोकरी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न*
धडगाव(प्रतिनिधी):-कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि आदिवासी सेवा शिक्षण प्रसारक मंडळ, धडगाव संचलित महाराज ज. पो. वळवी महाविद्यालय, धडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानविस्तार उपक्रमांतर्गत ‘नोकरी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. हा कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष मा. हेमंतभाऊ वळवी व सचिव अरुण वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. ए. गायकवाड होते. यावेळी मंचावर वनपरिक्षेत्र अधिकारी रोहन पाटील, पोलीस उपनिरीक्षक गणेश बुरकुल, डॉ. खुमानसिंग वळवी, प्रा. दिनेश पावरा व प्राचार्य डॉ. राजू पवार उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविकात डॉ. राजू पवार म्हणाले की, ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबद्दल खरी माहिती मिळावी, हाच या कार्यशाळेचा उद्देश आहे. स्पर्धा परीक्षा फक्त शहरातील मुलांसाठी आहे, हा गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. मार्गदर्शन सत्रात रोहन पाटील म्हणाले, "MPSC/UPSC ही केवळ परीक्षा नसून ती एक विचारप्रक्रिया आहे. अक्राणी सारख्या दुर्गम भागातूनही अधिकारी घडू शकतात, फक्त जिद्द आणि सातत्य हवे." त्यांनी NCERT पुस्तके, नोट्स काढणे व वर्तमानपत्र वाचनाचे महत्त्व सांगितले.
गणेश बुरकुल यांनी पोलीस भरतीसाठी लागणारी शारीरिक व लेखी तयारी आणि वेळेचे व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले. प्रा. दिनेश पावरा यांनी पोलीस भरती 2026 चा नवीन पॅटर्न, लेखी व मैदानी चाचणीची रणनीती आणि ग्राउंडच्या तयारीबाबत सविस्तर माहिती दिली. डॉ. खुमानसिंग वळवी यांनी पदवीनंतर करिअरच्या संधी, इंग्रजी विषयाची भीती दूर करणे आणि मुलाखतीची तयारी यावर मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. एस. ए. गायकवाड म्हणाले, "आज केवळ पदवीने नोकरी मिळत नाही,नियोजनबद्ध अभ्यास करणारा विद्यार्थीच यशस्वी होतो. आजचे मार्गदर्शन फक्त ऐकू नका तर ध्येय वहीत लिहून काढा. याच मातीतून उद्याचे अधिकारी घडतील."
कार्यक्रमास प्रा. एन. पी. विभांडिक, डॉ. डी. व्ही. पाटील, प्रा. एस. एस. पाटील, डॉ. एम. एच. पाटील, डॉ. व्ही. जी. गोणेकर, डॉ. ए. एस. राठोड, प्रा. कल्पना साळवे, डॉ. एच. एम. पवार, डॉ. एस. ई. शिंदे, डॉ. एल. एस. सूर्यवंशी, प्रा. गणेश मोरे, डॉ. व्ही. डी. जाधव, प्रा. एम. बी. वळवी, डॉ. एस. एस. पोले, कार्यालयीन अधीक्षक मा. मनोज बी. पावरा, प्रा. आर. टी. राहसे, प्रा. एल. आर. वसावे, प्रा. प्रियदर्शनी वळवी, प्रा. रवीना वळवी, प्रा. कालुसिंग वसावे, प्रा. मधुकर पाडवी, हर्षद पाडवी, रातीलाल पावरा, पांडुरंग वळवी  यांच्यासह प्राध्यापक  प्राध्यापकेतर व 100 हून  जास्त विद्यार्थी  उपस्थित होते. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना फक्त भाषण नाही तर प्रत्यक्ष नोकरी मिळवण्यासाठी लागणारी संपूर्ण प्रोसेस समजावून सांगण्यात आली.
या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांबद्दल मोठी जागरूकता निर्माण झाली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय महाले यांनी केले, तर कार्यक्रमाचे समन्वयक डॉ अनिल शिंदे यांनी  आभार मानले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*धडगाव येथे नोकरी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न*
September, 09 2026
*गणित संबोध परीक्षेत एस.ए.मिशन हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश,70 विद्यार्थी उत्तीर्ण*
September, 09 2026
*पालकमंत्री हसन मुश्रीफ 10 सप्टेंबर रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर*
September, 09 2026
*विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) 2026 कार्यक्रम, मतदार यादीत दावे व हरकतीसाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत, अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबरला होणार प्रसिद्ध, जिल्हा प्रशासनाचे नागरिकांना आवाहन*
September, 09 2026
*पावसाच्या खंड काळात पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना कराव्यात-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे*
September, 09 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज