*पावसाच्या खंड काळात पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना कराव्यात-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*पावसाच्या खंड काळात पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना कराव्यात-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे*
*पावसाच्या खंड काळात पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी विविध उपाययोजना कराव्यात-जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे*
नंदुरबार(प्रतिनिधी):-हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदाच्या नैऋत्य मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. एल- निनोच्या प्रभावामुळे खरीप हंगामात पावसाचे आगमन व वितरणात अनियमितता झाली असून, काही भागांमध्ये पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांवर ताण निर्माण झाला आहे. काही तालुक्यांमध्ये तीन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीकरिता पावसात खंड पडल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर कृषी आयुक्तालय, पुणे यांच्या सूचनेनुसार नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिके वाचविण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, शंकर किरवे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. जमिनीतील ओलावा टिकविण्यासाठी उपाययोजना,
पिकांमध्ये आच्छादन (मल्चिंग) करावे तसेच कोळपणी करून पिकास मातीची भर द्यावी. बाष्पीभवन कमी करण्यासाठी पिकांच्या खालील भागातील पाने कमी करावीत आणि वाऱ्यावर आधारित आंतरपीकांचा वापर करावा.
पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन,
संरक्षित पाणी उपलब्ध असल्यास सकाळी किंवा संध्याकाळी पिकास पाणी द्यावे. ठिबक अथवा तुषार सिंचनास प्राधान्य द्यावे. यामुळे सुमारे 30 ते 50 टक्के पाण्याची बचत होऊ शकते. तसेच शेततळे व साठवण बंधाऱ्यातील संरक्षित पाणी सिंचनासाठी वापरावे. पावसाचे पाणी जास्तीत जास्त जमिनीत मुरविण्यावर भर द्यावा. पिकांवरील ताण कमी करण्यासाठी,
पिकांवरील ताण नियंत्रण व आंतरमशागत करावी. पावसाचा ताण पडल्यास 1 टक्का युरिया/डीएपी अथवा 19:19:19 किंवा पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करावी.
भाजीपाला व फळबागांचे संरक्षण, लहान रोपाना सावली करावी. प्लास्टिक मल्चिंग व ठिबक सिंचनाचा वापर करावा तसेच नत्रयुक्त खतांचा वापर कमी करावा. फळझाडांच्या बुंध्याभोवती गवत, पालापाचोळा टाकून आच्छादन करावे. पाण्याचा ताण कमी करण्यासाठी केओलिन 8 टक्का किंवा पोटॅशियम नायट्रेट 1 ते 2 टक्के द्रावण फवारावे. तसेच 1 टक्के बोडों मिश्रणाची फवारणी व खोडांना 10 टक्के बोर्डोपेस्ट लावावी.
पीक संरक्षणावर भर, कीड व रोग नियंत्रणासाठी योग्य फवारणी करावी. पक्षीघरे, चिकट सापळे व मित्र कीटकांचे संवर्धन करावे. हुमणी, शेंडी गोगलगाय व बोंडअळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.
हवामानाच्या अंदाजानुसार शेतीचे नियोजन,
हवामान खात्यामार्फत पुढील पाच दिवसांचा पावसाचा अंदाज दिला जातो. शेतकऱ्यांनी या अंदाजाची माहिती घेऊन शेतीच्या कामांचे नियोजन करावे. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.



