*देवरे विद्यालयात विद्यार्थ्यांनी साकारली शिक्षकांची भूमिका*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवरे विद्यालयात विद्यार्थ्यांनी साकारली शिक्षकांची भूमिका*
*देवरे विद्यालयात विद्यार्थ्यांनी साकारली शिक्षकांची भूमिका*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील धंगाई विधायक कार्य मंडळ संचलित आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय विखरण येथे शिक्षक दिनानिमित्त डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक डी.डी.साळुंके व प्रमुख अतिथी सरपंच प्रतिनिधी केशव वामन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दिवसभराचे अध्यापनाचे व इतर शैक्षणिक कामकाज विद्यार्थ्यांनी सांभाळले. विद्यालयातील सर्व गुरुजनांचा स्वागत सन्मानानंतर नियोजित शालेय तासिकांना मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतरांची भूमिका मांडताना विविध दिवसभरातील प्रसंग विद्यार्थी शिक्षकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त कथन करताना विविध अनुभव सांगितले.शिक्षक दिनी मुख्याध्यापकाची भूमिका बजावणाऱ्या दीपेश लोहार याने मुख्याध्यापकाची भूमिका म्हणजे कशी तारेवरची कसरत असते याविषयी आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुंजन पाटील हिने केले. कार्यक्रमाच्या व्याख्यात्या डॉ. आर.आर. बागुल यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याचा उल्लेख करत असताना बालपण, प्राध्यापक ते उपराष्ट्रपती भारतरत्न पुरस्कार प्राप्त होईपर्यंतचा सर्व प्रवास आपल्या मार्गदर्शनातून मांडला. अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांच्या गुरुगौरवाप्रती आपले मत मांडताना विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाचा वसा जोपासून भविष्यातील उज्वल यश संपादन केले तोच शिक्षकांचा खरा सत्कार असेल या शब्दांत व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तनुषा पाटील व भावेश पानपाटील यांनी तर आभार रुपेश पाटील यांनी मानले.



