ताजा खबरे:
*“नंदुरबार क्रीडा क्षेत्राचे हब व्हावे खेळाडू, कलावंत आणि ज्ञानवंतांना संधी मिळावी”-डॉ.रविंद्र चौधरी बुद्धिबळ प्रथम स्पर्धेत 250 विद्यार्थ्यांचा सहभाग*
*शहीद शिरीषकुमार मेहता यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘चावरा डान्स फिएस्टा’ उत्साहात*
*मुक्त कृषि शिक्षण केंद्र, कोळदा येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
*अन्यायकारक संच मान्यतेच्या विरोधात पुणे येथे धडक मोर्चा,राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची अभूतपूर्व एकजूट*
*ओणी येथील फ्लायओव्हर ब्रिजला झाडे आली, पुलाच्या कामाचे ऑडिट करण्याची जनतेची मागणी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*“नंदुरबार क्रीडा क्षेत्राचे हब व्हावे खेळाडू, कलावंत आणि ज्ञानवंतांना संधी मिळावी”-डॉ.रविंद्र चौधरी बुद्धिबळ प्रथम स्पर्धेत 250 विद्यार्थ्यांचा सहभाग*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*“नंदुरबार क्रीडा क्षेत्राचे हब व्हावे खेळाडू, कलावंत आणि ज्ञानवंतांना संधी मिळावी”-डॉ.रविंद्र चौधरी बुद्धिबळ प्रथम स्पर्धेत 250 विद्यार्थ्यांचा सहभाग*

  • Share:

*“नंदुरबार क्रीडा क्षेत्राचे हब व्हावे खेळाडू, कलावंत आणि ज्ञानवंतांना संधी मिळावी”-डॉ.रविंद्र चौधरी बुद्धिबळ प्रथम स्पर्धेत 250 विद्यार्थ्यांचा सहभाग*
नंदुरबार(प्रतिनिधी):-“नंदुरबारच्या मातीत अनेक प्रतिभावान खेळाडू, कलावंत आणि ज्ञानवंत आहेत. त्यांच्या गुणवत्तेला योग्य व्यासपीठ मिळाले, तर ते जिल्ह्याचे नाव राज्य आणि देशपातळीवर उज्ज्वल करू शकतात. नंदुरबार हे क्रीडा क्षेत्राचे हब व्हावे, तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि बौद्धिक क्षमतेला वाव मिळावा, या उद्देशाने हिरा प्रेरणा महोत्सवाची संकल्पना पुढे आली आहे,” असे प्रतिपादन हिरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र हिरालाल चौधरी यांनी केले. पुढे त्यांनी आपल्या भाषणातून महोत्सवामागील संकल्पना स्पष्ट करताना संस्थापक अध्यक्ष स्व. काकासाहेब हिरालाल चौधरी यांच्या दूरदृष्टीचा विशेष उल्लेख केला. खेळाडू, कलावंत आणि ज्ञानवंतांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा या महोत्सवाचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात हा महोत्सव जिल्हास्तरावरून राज्यस्तरावर आयोजित करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. नंदुरबार क्रीडा क्षेत्राचे हब व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यानंतर हिरा प्रतिष्ठानचे सचिव तथा माजी आमदार शिरीष चौधरी यांनी आपल्या भाषणातून संस्थापक अध्यक्ष स्व.काकासाहेब हिरालाल चौधरी यांची शिक्षणाविषयीची तळमळ, दूरदृष्टी आणि सर्वसामान्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याची त्यांची इच्छा याविषयी माहिती दिली. काकासाहेबांनी पाहिलेले शैक्षणिक व सामाजिक विकासाचे स्वप्न पूर्णत्वास नेण्यासाठी हिरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, “खेळामध्ये हरणे किंवा जिंकणे यापेक्षा स्पर्धेत सहभागी होणे महत्त्वाचे आहे,” असे सांगितले. खेळातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, शिस्त, संघभावना आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित होतो. विद्यार्थ्यांनी प्रत्येक स्पर्धेकडे शिकण्याची आणि स्वतःला घडविण्याची संधी म्हणून पाहावे, असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे अधिव्याख्याता डॉ. रमेश चौधरी यांनी आपल्या भाषणातून संस्थापक अध्यक्ष स्व. काकासाहेब हिरालाल चौधरी यांच्याशी असलेल्या परिचयाच्या आठवणी सांगत त्यांच्या शिक्षणाविषयीच्या तळमळीवर प्रकाश टाकला. सर्वसामान्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्याची त्यांची इच्छा आणि शिक्षण क्षेत्राबाबतची दूरदृष्टी याविषयी त्यांनी माहिती दिली. हिरा प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. तसेच यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांना 15 सप्टेंबर 2026 मंगळवार रोजी हिरा प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलात स्व. काकासाहेबांच्या स्मृती स्थळाला विनम्र अभिवादन व सर्व स्पर्धेतील विजेते विद्यार्थ्यांना पारितोषिक व बक्षीस वितरण करण्यासाठी सस्नेह निमंत्रित करण्यात आले.
कार्यक्रमास हिरा प्रतिष्ठानचे उपाध्यक्षा सौ. अनिता चौधरी, उपशिक्षणाधिकारीनिलेश लोहकरे, वेतन अधीक्षक भगवान कोळपे, गटशिक्षणाधिकारी जयंत चौरे, नंदुरबार नगरपालिका उपनगराध्यक्ष प्रथमेश चौधरी, नगरसेवक गौरव चौधरी, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश चौधरी, प्रकाश मक्कन चौधरी, अॅड. उमा चौधरी, राजेंद्र चौधरी, संस्थेचे सहसचिव महेंद्र फटकाळ, राष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक शिवराज खांडे, क्रीडा मार्गदर्शक ईश्वर धामणे यांच्यासह शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांचे प्राचार्य, प्राथमिक विद्या मंदिरांचे मुख्याध्यापक राहुल मोरे, भद्रेश त्रिवेदी, सुनील खैरनार, धर्मेंद्र मराठे, सौ. राजश्री अहिरराव, योगेश निकम, सौ. मीनाक्षी भदाणे, सुनील सूर्यवंशी, करण चव्हाण, सुरेंद्र पाटील, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिरा प्रेरणा महोत्सव 2026 पर्व 1 ले अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा, बौद्धिक, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये बुद्धिबळ, व्हॉलीबॉल, शॉर्ट व्हॉलीबॉल यांसह निबंध, वक्तृत्व व वादविवाद स्पर्धांचा समावेश आहे. तसेच सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. ‘हिरा प्रेरणा महोत्सव 2026 पर्व 1 ले’ चे उद्घाटन आज बुद्धिबळ स्पर्धेने उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या बुद्धिबळ स्पर्धेत तब्बल 250 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने महोत्सवाला दिमाखदार सुरुवात झाली. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व्यासपीठ देणारा हा महोत्सव नंदुरबारच्या शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. सदर समारंभाचे प्रास्ताविक सहकार महर्षी अण्णासाहेब पी. के. पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक अनिल चौधरी सूत्रसंचालन प्रा. गणेश पवार व आभार प्रदर्शन काकासाहेब प्राथमिक विद्या मंदिराचे मुख्याध्यापक युवराज भामरे यांनी केले.
महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी हिरा प्रतिष्ठानच्या अधिनस्त सर्व विभागांतील कर्मचारी, शिक्षक व सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*“नंदुरबार क्रीडा क्षेत्राचे हब व्हावे खेळाडू, कलावंत आणि ज्ञानवंतांना संधी मिळावी”-डॉ.रविंद्र चौधरी बुद्धिबळ प्रथम स्पर्धेत 250 विद्यार्थ्यांचा सहभाग*
September, 06 2026
*शहीद शिरीषकुमार मेहता यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘चावरा डान्स फिएस्टा’ उत्साहात*
September, 06 2026
*मुक्त कृषि शिक्षण केंद्र, कोळदा येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा
September, 06 2026
*अन्यायकारक संच मान्यतेच्या विरोधात पुणे येथे धडक मोर्चा,राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची अभूतपूर्व एकजूट*
September, 06 2026
*ओणी येथील फ्लायओव्हर ब्रिजला झाडे आली, पुलाच्या कामाचे ऑडिट करण्याची जनतेची मागणी*
September, 06 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज