*महात्मा गांधी इंग्लिश स्कूल खापर येथे सेवानिवृत्त पर्यवेक्षकांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*महात्मा गांधी इंग्लिश स्कूल खापर येथे सेवानिवृत्त पर्यवेक्षकांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न*
*महात्मा गांधी इंग्लिश स्कूल खापर येथे सेवानिवृत्त पर्यवेक्षकांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न*
खापर(प्रतिनिधी):-महात्मा गांधी इंग्लिश स्कूल, खापर येथे शाळेचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक मेघ: श्याम भाईदास चव्हाण यांचा सेवापूर्ती गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण, भावनिक व आपुलकीच्या वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी. ई. सोसायटी, तळोदेचे सचिव तथा महात्मा गांधी इंग्लिश स्कूल, खापर व राणा प्रताप इंग्लिश स्कूल, प्रतापपूर या शाळांचे चेअरमन प्रभाकर संभू चौधरी होते. तसेच पी. ई. सोसायटीच्या ज्येष्ठ संचालिका सौ. रत्ना प्रभाकर चौधरी यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सेवानिवृत्त पर्यवेक्षक मेघ: श्याम भाईदास चव्हाण आणि त्यांच्या पत्नी सौ. वैशाली मेघ:श्याम चव्हाण यांचा सपत्नीक सत्कार संस्थेच्या आणि शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, ड्रेस आणि साडी देऊन सत्कार करण्यात आला.या वेळी उपस्थित मान्यवरांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेचा गौरवपूर्ण उल्लेख केला. मेघ: श्याम भाईदास चव्हान यांनी पर्यवेक्षक म्हणून शाळेच्या शैक्षणिक व प्रशासकीय कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. शिस्तप्रियता, नियोजनबद्ध कामकाज, सहकाऱ्यांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली त्यांची तळमळ यामुळे त्यांनी शाळेच्या प्रगतीमध्ये मोलाची भूमिका बजावली. विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मनात त्यांचे विशेष स्थान निर्माण झाले. या कार्यक्रमासाठी एम.बी .चव्हाण यांच्या परिवारातील सदस्य त्यांच्या पत्नी सौ. वैशाली चव्हाण, त्यांचे चिरंजीव विवेक चव्हाण आणि त्यांच्या सूनबाई सौ. निकिता विवेक चव्हाण कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आपल्या मनोगतातून सत्कारमूर्ती च्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या मार्गदर्शनाचा व सहकार्याचा शाळेच्या वाटचालीत मोठा वाटा असल्याचे सांगताना अनेक शिक्षक व सहकाऱ्यांना भावना अनावर झाल्या. विद्यार्थ्यांनीही आपल्या आवडत्या शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात प्रभाकर संभू चौधरी यांनी सेवानिवृत्ती हा सेवेला पूर्णविराम नसून जीवनाच्या नव्या पर्वाची सुरुवात असल्याचे सांगितले. शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे व निष्ठेने केलेली सेवा ही समाजासाठी सदैव प्रेरणादायी असते, असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमादरम्यान सत्कारमूर्तींनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि सन्मानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. शाळेशी असलेले आपले ऋणानुबंध सदैव कायम राहतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या सेवापूर्ती सोहळ्यासाठी खापर गावाचे लोकनियुक्त सरपंच किरण पाडवी,उपसरपंच विनोद कामे, ललित जाट माजी उपसरपंच, खापर, डॉ. संजय नारायण चौधरी, योगेश सोनार, अरविंद अग्रवाल आणि सौ प्रियंका अग्रवाल माजी उपसरपंच: ग्रामपंचायत खापर सौ. आरती शिंपी, शिक्षण विस्तार अधिकारी, तळोदा. क्षेत्रीय मराठा समाजाचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते तसेच आणि संपूर्ण खापर गावातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तथा वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर, अतिथींची उपस्थिती लाभली कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी एम. बी, चव्हाण यांना निरोगी, आनंदी व यशस्वी जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.या निरोप समारंभामुळे महात्मा गांधी इंग्लिश स्कूल, खापर येथे गुरु- शिष्य नात्याची जिव्हाळ्याची परंपरा आणि संस्थेप्रती असलेली कृतज्ञता पुन्हा एकदा अधोरेखित झाली. भावनिक वातावरणात पार पडलेल्या या निरोप समारंभाने उपस्थितांच्या मनात कायमस्वरूपी आठवणी निर्माण केल्या. कार्यक्रमाचे यशस्वी संचालन होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक एस. व्ही.पाटील यांनी मार्गदर्शन केले आणि कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. एस. गावित यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती. एन.बी राणे यांनी केले, यावेळी विनोद कामे, ललित जाट, डॉ. संजय चौधरी, यांनी आपले मनोगत व्यक्त केले, विवेक चव्हाण, सौ. निकिता विवेक चव्हाण शेवटी मुख्याध्यापकांनी आलेल्या उपस्थित मान्यवरांचे आपल्या शब्दसुमनांनी आभार व्यक्त केले व कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.



