*प्रकाशा येथील जि.प.कन्या शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रकाशा येथील जि.प.कन्या शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा*
*प्रकाशा येथील जि.प.कन्या शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद कन्या शाळा, प्रकाशा येथे भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केंद्रप्रमुख मनोज पिंजारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र पाटील, शिक्षक गोपाल गावित, शिक्षिका श्रीमती नूतन पाटील, श्रीमती प्रियंका पाटील तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षक दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी विशेष उत्साहाने ‘एक दिवस शिक्षकांच्या भूमिकेत’ हा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका स्वीकारून वर्गामध्ये अध्ययन -अध्यापनाचे कार्य केले. विद्यार्थ्यांनी फळ्यावर लेखन करणे, धडे समजावून सांगणे, प्रश्न विचारणे तसेच सहाध्यायांच्या शंकांचे निरसन करणे अशा विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या कार्याची, जबाबदारीची आणि अध्यापन प्रक्रियेची प्रत्यक्ष अनुभूती मिळाली. हसत-खेळत आणि आनंददायी वातावरणात विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि शिक्षकांच्या भूमिकेत काम करण्याचा आनंद यामुळे शाळेचे वातावरण चैतन्यमय झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांना डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शैक्षणिक विचारांची व शिक्षकांच्या समाजातील महत्त्वपूर्ण भूमिकेची माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या भूमिकेतून घेतलेला अनुभव हा त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी तसेच नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि संवाद कौशल्य वृद्धिंगत करण्यासाठी उपयुक्त ठरला.
अशा नाविन्यपूर्ण व विद्यार्थी-केंद्रित उपक्रमातून जिल्हा परिषद कन्या शाळा, प्रकाशा येथे शिक्षक दिन आनंद, उत्साह आणि शैक्षणिक वातावरणात साजरा करण्यात आला.



