*शालिनी जयंत नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात शिक्षक दिन उत्साहात साजरा*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*शालिनी जयंत नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात शिक्षक दिन उत्साहात साजरा*
*शालिनी जयंत नटावदकर प्राथमिक विद्यामंदिरात शिक्षक दिन उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शालिनी जयंत नटावदकर प्राथमिक विद्यामंदिर, नंदुरबार येथे भारताचे माजी राष्ट्रपती, थोर तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ आणि आदर्श शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदाच्या शिक्षक दिनाचे विशेष आकर्षण म्हणजे इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शाळेचे दैनंदिन कामकाज सांभाळत शिक्षक व प्रशासकीय पदाधिकाऱ्यांच्या भूमिका प्रत्यक्ष अनुभवणे हे होते.
शिक्षक दिनानिमित्त इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या कामकाजाची जबाबदारी उत्साहाने स्वीकारली. विद्यार्थ्यांमधून अवनी हितेश वसईकर हिने मुख्याध्यापक, सेजल सचिन राजपूत हिने उपमुख्याध्यापक, तर प्रज्ञेश मुकेश हिरे याने पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांनी शाळेच्या दैनंदिन कामकाजाचे नियोजन व समन्वय करत आपापल्या भूमिका प्रभावीपणे पार पाडल्या. विशेष म्हणजे, इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका स्वीकारून विविध वर्गांमध्ये जाऊन प्रत्यक्ष अध्यापनही केले. शिक्षक म्हणून वर्गासमोर उभे राहून विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अनोखा अनुभव त्यांनी घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या कार्याची जबाबदारी, अध्यापनाचे महत्त्व, नेतृत्वगुण, शिस्त आणि नियोजन यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. शिक्षक दिनाच्या मुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक सुनील खैरनार होते. कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या श्रीमती दिपाली पाटील यांनी आपल्या मनोगतातून शिक्षक दिनाचे महत्त्व विशद केले. शिक्षक हे विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देऊन भावी जीवनाची योग्य दिशा निश्चित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती प्रणाली बोरकर यांनी केले. शिक्षक दिनानिमित्त राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक विद्यामंदिरातील सर्व शिक्षक बंधू- भगिनी तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी शिक्षक व प्रशासकीय पदाधिकाऱ्यांच्या भूमिका प्रत्यक्ष अनुभवत साजरा केलेला हा शिक्षक दिन सर्वांसाठी संस्मरणीय आणि प्रेरणादायी ठरला.



